Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम आणि सीतेला निमंत्रण, पण मला नाही, ‘रामायणा’ तील ‘लक्ष्मण’ नाराज, उद्घाटनापूर्वीच मानापमान नाट्य

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सुनील लाहिरी म्हणाले, 'प्रत्येक वेळी तुम्हाला बोलावलेच पाहिजे असे नाही. मला बोलावले असते तर मी नक्कीच गेलो असतो. मला आमंत्रित केले असते तर बरे झाले असते. मलाही इतिहासाचा भाग बनण्याची संधी मिळाली असती, पण हरकत नाही. काळजी करण्यासारखे काही नाही.

राम आणि सीतेला निमंत्रण, पण मला नाही,  'रामायणा' तील 'लक्ष्मण' नाराज, उद्घाटनापूर्वीच मानापमान नाट्य
रामायण मालिकेत लक्ष्मणाची भुमिका साकारणारे सुनील लेहिरी
Follow us
| Updated on: Dec 30, 2023 | 11:04 AM

मुंबई : अयोध्या राम मंदिराच्या (Ram Mandir) भव्य उद्घाटन सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. प्रभू रामाच्या अभिषेक सोहळ्यात बॉलिवूडपासून छोट्या पडद्यापर्यंतचे अनेक दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेमध्ये रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविलला निमंत्रण पाठवण्यात आले आहे. सीतामातेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलियालाही निमंत्रित करण्यात आले आहे, मात्र लक्ष्मणाची भुमिका निभावणारे सुनील लाहिरी यांना या दिमाखदार कार्यक्रमात येण्याचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. यामुळे ते खूप दुखावले आहेत आणि याबद्दल त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. सुनील लाहिरी यांनी याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सुनील लाहिरी यांनी प्रतिक्रिया दिली

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सुनील लाहिरी म्हणाले, ‘प्रत्येक वेळी तुम्हाला बोलावलेच पाहिजे असे नाही. मला बोलावले असते तर मी नक्कीच गेलो असतो. मला आमंत्रित केले असते तर बरे झाले असते. मलाही इतिहासाचा भाग बनण्याची संधी मिळाली असती, पण हरकत नाही. काळजी करण्यासारखे काही नाही. कदाचित त्यांना मी आवडलो नसावा असं ते म्हणाले. यानंतर सुनील लाहिरी यांनी ‘रामायण’च्या निर्मात्यांनाही आमंत्रित करण्यात आले नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले, ‘कदाचित त्यांना वाटत असेल की लक्ष्मणचे पात्र तितकेसे महत्त्वाचे नाही किंवा त्यांना मी वैयक्तिकरित्या आवडलो नसावा. मी प्रेमसागरसोबत होतो, पण त्यांनाही बोलावले नव्हते. मला हे विचित्र वाटते की त्यांनी रामायणाच्या कोणत्याही निर्मात्यांना आमंत्रित केले नाही.

हे सुद्धा वाचा

समितीचा वैयक्तिक निर्णय

ते पुढे म्हणाले, ‘कुणाला निमंत्रित करायचे की नाही, हा समितीचा वैयक्तिक निर्णय आहे. मी ऐकले की 7000 पाहुणे आणि 3000 VIP आमंत्रित आहेत. त्यामुळे मला वाटते की त्यांनी रामायण मालिकेशी संबंधित असलेल्यांना, विशेषत: मुख्य कलाकार आणि निर्मात्यांनाही आमंत्रित करायला हवे होते. अशाप्रकारे सुनील लाहिरी यांनी स्पष्ट केले की, त्यांना राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला आमंत्रित केले असते तर ते नक्कीच गेले असते.

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.