Surya Arghya: सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचे आहेत अनेक फायदे, रविवारी केलेल्या या उपायाने मिळतो विशेष लाभ

हिंदू धर्मात सूर्याची देवता म्हणून पूजा केली जाते. पुजापाठ केल्यानंतर अनेक जण  सकाळी सूर्याला अर्घ्य देतात. सूर्याला अर्घ्य अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि मान-सन्मान वाढतो अशी मान्यता आहे.

Surya Arghya: सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचे आहेत अनेक फायदे, रविवारी केलेल्या या उपायाने मिळतो विशेष लाभ
सूर्याला अर्घ्य देण्याचे फायदे Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 11:14 AM

हिंदू धर्मात रविवार हा सूर्य देवाला (Surya Dev) समर्पित आहे. असे मानले जाते की, सूर्य हा एकमेव देव आहे जो नियमितपणे भक्तांना प्रत्यक्ष दर्शन देतो. माणसाच्या आयुष्यात सूर्याचे मोठे योगदान असते. जोतिषशास्त्रानुसार (Astrology) कुंडलीत सूर्याचे स्थान बलवान असेल तर त्या व्यक्तीला जीवनात भरपूर यश आणि प्रसिद्धी मिळते. दुसरीकडे, कुंडलीत सूर्याची स्थिती योग्य नसल्यास जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा वेळी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी रोज सकाळी सूर्याला जल अर्पण (Surya Arghya) करावे. हिंदू धर्मात सूर्याची देवता म्हणून पूजा केली जाते. पुजापाठ केल्यानंतर अनेक जण  सकाळी सूर्याला अर्घ्य देतात. सूर्याला अर्घ्य अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि मान-सन्मान वाढतो अशी मान्यता आहे. याशिवाय कोणत्याही कारणाने लग्नाला उशीर होत असेल तर नियमितपणे सूर्याला जल अर्पण केल्यास विवाह योग लवकर जुळून येतो, पण सूर्याला जल देताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. चला जाणून घेऊया सूर्यदेवाला जल अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

सूर्याला अर्घ्य देण्याची पद्धत

सूर्यदेवाला नेहमी तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करावे. सूर्याला फक्त सकाळी म्हणजेच सूर्योदयाच्या वेळी जल अर्पण करावे. सकाळी अर्घ्य देणे  फायदेशीर मानले जाते. सूर्याला अर्घ्य देताना आपले तोंड पूर्वेकडे असावे. पाण्यात रोली किंवा लाल चंदन टाकावे. याशिवाय सूर्यदेवाला लाल फुले अर्पण करणे देखील शुभ मानले जाते.

सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याचे लाभ

दररोज सूर्याला जल अर्पण केल्याने सूर्यदेवाचा प्रभाव शरीरावर वाढतो, अशी धार्मिक मान्यता आहे. यामुळे तुमच्यातील ऊर्जा वाढते. तसेच रोज सूर्याला जल अर्पण केल्याने आत्मशुद्धी आणि बल प्राप्त होते. समाजात मान-सन्मानही वाढतो.

हे सुद्धा वाचा

रविवारी करावा सूर्यदेवाच्या मंत्राचा जप

रविवारी जल अर्पण केल्यानंतर सूर्यदेवाच्या मंत्रांचा जप करावा. सूर्याच्या या मंत्रांचा जप केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात. मंत्राचा जप करताना उच्चर स्पष्ट असावे.

  • ॐ घृणिं सूर्य्य: आदित्य:
  • ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा
  • ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते, अनुकंपयेमां भक्त्या, गृहाणार्घय दिवाकर:
  • ॐ ह्रीं घृणिः सूर्य आदित्यः क्लीं ॐ
  • ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः
  • ॐ सूर्याय नम:
  • ॐ घृणि सूर्याय नम:
  • ॐ भास्कराय नमः
  • ॐ अर्काय नमः
  • ॐ सवित्रे नमः

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.