Surya Dosh : पत्रिकेत असेल सूर्यदोष तर करावा लागतो अनेक समस्यांचा सामना, हे उपाय ठरतात फायदेशीर

कुंडलीत सूर्य दोष असल्यास व्यक्तीला प्रत्येक मार्गावर अडचणींचा सामना करावा लागतो. सूर्यदोषामुळे कोणत्याही कामात यश मिळत नाही. ज्योतिषशास्त्रात सूर्य ग्रहाला बलवान बनवण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. सूर्य ग्रह दोषावरील उपाय जाणून घेऊया .

Surya Dosh : पत्रिकेत असेल सूर्यदोष तर करावा लागतो अनेक समस्यांचा सामना, हे उपाय ठरतात फायदेशीर
सुर्यदेवImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 30, 2023 | 12:08 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात सूर्य हा  सर्व ग्रहांचा राजा मानला जातो. ज्यांच्या कुंडलीत सूर्य कमजोर (Surya Dosh) असतो, त्याला आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. धार्मिक मान्यतांनुसार, आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेच्या पूजेसाठी समर्पित असतो. रविवारी सूर्यदेवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी त्यांच्याशी संबंधित उपाय केल्याने ते प्रसन्न होतात आणि साधकावर त्यांची कृपादृष्टी कायम राहते.  अनेकांना त्यांच्या महत्त्वच्या कामात अडथळे येतात किंवा नको त्या अडचणी येऊ लागतात. ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील दोष हे देखील यामागे मुख्य कारण असू शकते. विशेषत: तुमच्या कुंडलीत सूर्याशी संबंधित काही दोष असेल तर रविवारी हे उपाय अवश्य करा. यामुळे तुमच्या आयुष्यात येणारे संकट दूर होतील. जाणून घेऊया पत्रिकेतील कमजोर सूर्याशी संबंधित काही उपाय.

पत्रिकेतील सूर्य ग्रह बलवान करण्याचे उपाय

  1. ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी ब्रह्म मुहूर्तावर सर्वप्रथम उठून स्नान करावे. यानंतर एका तांब्याच्या गडव्यात पाणी घेऊन त्यात काही अक्षत, फुले आणि दुर्वा टाकून त्या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यावे.  असे रोज केल्याने सूर्य ग्रहाशी संबंधित दोष कमी होतात.
  2. ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील सूर्याशी संबंधित दोष दूर करण्यासाठी रत्न धारण करणे देखील फायदेशीर मानले जाते. जर तुमच्या पत्रिकेत सूर्य कमजोर असेल तर माणीक रत्न धारण करणे शुभ मानले जाते. कोणत्याही ज्योतिषाच्या सल्ल्याशिवाय रत्ने घालू नये याची विशेष काळजी घ्या.
  3. धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सूर्याशी संबंधित दोषही दूर होतात. रविवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाजवळ तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने ग्रह दोष दूर होतात.
  4. ज्यांच्या कुंडलीत सूर्य ग्रहाशी संबंधित दोष आहेत त्यांनी रविवारी व्रत ठेवावे. तसेच रविवारी मीठाचे सेवन करू नये.
  5. ग्रह दोष दूर करण्यासाठी दान आणि दक्षिणा देखील लाभदायक मानली जाते. रविवारी एखाद्या गरजू व्यक्तीला गूळ, सोने, कपडे, गहू इत्यादी वस्तू दान करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....
सरकार कधी स्थापन होणार? दीपक केसरकरांनी थेटच सांगितलं... काय घडतंय?
सरकार कधी स्थापन होणार? दीपक केसरकरांनी थेटच सांगितलं... काय घडतंय?.
निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती
निवडणुका संपताच शासन आदेश जारी, रश्मी शुक्लांची पुन्हा नियुक्ती.
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार
शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, काळजीवाहू CM म्हणून पाहणार कारभार.
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'
सत्तास्थापनेपूर्वी शिंदेंचं मोठं ट्विट, 'शिवसैनिकांनी एकत्र येऊ नये..'.
नवा CM कोण? फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हायकमांडचा ग्रीन सिग्नल?
नवा CM कोण? फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हायकमांडचा ग्रीन सिग्नल?.