केशरशी संबंधित हे उपाय करा, समस्या तर दूर होतीलच पण आयुष्य ‘धन’ धनाधन धन होईल!

वास्तू शास्त्राप्रमाणेच ज्योतिष शास्त्रातही आयुष्य चांगलं जगण्यासाठी काही उपया सूचवण्यात आले आहेत. संपत्तीची कमी (Money problem), कौटुंबिक बखेडे, घरातील सदस्यांच्या आजाराच्या तक्रारी (bad health) आदी समस्या दूर करण्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता.

केशरशी संबंधित हे उपाय करा, समस्या तर दूर होतीलच पण आयुष्य 'धन' धनाधन धन होईल!
saffron
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 7:00 AM

मुंबई: वास्तू शास्त्राप्रमाणेच ज्योतिष शास्त्रातही आयुष्य चांगलं जगण्यासाठी काही उपया सूचवण्यात आले आहेत. संपत्तीची कमी (Money problem), कौटुंबिक बखेडे, घरातील सदस्यांच्या आजाराच्या तक्रारी (bad health) आदी समस्या दूर करण्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता. ज्योतिष शास्त्राने सांगितलेले उपाय केल्यास घरातील नकारात्मकता दूर करून तुम्ही घरात सुख (Happiness in life), शांती आणू शकता. काही लोक सुख आणि समृद्धीसाठी केशरशी संबंधित उपाय करत असतात. तसं पाहिलं तर केशरला मसाला समजलं जातं. दूध आणि त्याच्याशी संबंधित गोष्टींमध्ये केशरचा वापर केला जातो. केशरचा संबंध धार्मिकतेशीही जोडला गेला आहे. त्यामुळेच पूजा अर्चनेत केशरला मानाचं स्थान असतं. थोडक्यात पूजा अर्चनेत केशर शुभ (Saffron jyotish tips) मानलं जातं. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, केशरशी संबंधित उपाय केल्यास घरातील समस्या दूर करता येऊ शकतात.

केशरचा संबंध बुध ग्रहाशी असल्याचंही सांगितलं जातं. या ग्रहाला प्रसन्न करून आर्थिक समस्या दूर केल्या जाऊ शकतात, अशी मान्यता आहे. या लेखात तुम्हाला केशरशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यामुळे तुमच्या अडचणी काही प्रमाणात दूर होण्यास मदतच होईल.

हे उपाय करा

1. खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या केशरमुळे तुम्ही घरातील समस्या दूर करू शकता. अनेक दिव्य यंत्र तयार करताना केशरच्या शाईचा वापर करण्यात येत असायचा. यावरून केशरचं महत्त्व किती मोठं आहे, याची कल्पना येते. पैशाची चणचण दूर करायची असेल तर सफेद कवड्या घ्या आणि त्यावर केशरचा रंग लावा. त्यानंतर या कवड्या लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा, असं केल्याने तुमची आर्थिक चणचण दूर होईल.

2. घरातील कलहामुळे कुटुंबात वारंवार झगडे होतात. घरातील निगेटिव्हीटीमुळे पती आणि पत्नीत नेहमीच भांडणं होतात. ज्योतिष शास्त्रानुसार केशरच्या उपायामुळे ही निगेटिव्हीटी दूर करता येते. त्यासाठी केशरचा पेस्ट बनवून घरातील सदस्यांनी तो आपल्या कपाळाला टिळा म्हणून लावावा. असं केल्याने मन शांत होतं, अशी मान्यता आहे.

3. कधी कधी गुरुच्या दोषामुळेही समस्या निर्माण होतात. जीवन किंवा घरातील दारिद्र्यामागे हे दोष आहेत हे लोकांना कळतच नाही. कुंडलीत गुरू ग्रह कमजोर असेल तर असं होतं. हे दोष दूर करायचे असेल तर तुम्हाला केशरचं दान केलं पाहिजे. आपल्या गुरूला केशर दान केल्याने हे दोष दूर होतात, अशी मान्यता आहे.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा

संबंधीत बातम्या

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी कायम लक्षात ठेवा, पैशांची कमतरता कधीच भासणार नाही

Vastu Tips : ही चमत्कारी वनस्पती घरामध्ये लावा आणि सुख-समृद्धी मिळवा!

Mercury transit | पुढील 24 तासात बदलणार तुमचे नशीब, या 3 राशींसाठी येणार सुखाचा काळ

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.