Lunar Eclipse 2022: मे महिन्यात वर्षाचे पहिले चंद्र ग्रहण, ‘या’ तीन राशींसाठी शुभ ठरणार

| Updated on: May 11, 2022 | 12:57 PM

वर्षाचे पहिले चंद्र ग्रहण येणाऱ्या पूर्णिमेच्या दिवशी लागू होत आहे. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार हे पूर्ण चंद्र ग्रहण असेल. हे चंद्रग्रहण तीन राशींसाठी खूप शुभ ठरू शकते. इथे जाणून घ्या या राशींमध्ये काय शुभ घडणार आहे

Lunar Eclipse 2022: मे महिन्यात वर्षाचे पहिले चंद्र ग्रहण, या तीन राशींसाठी शुभ ठरणार
Follow us on

30 एप्रिलला वर्षाचे पहिले सूर्य ग्रहण लागू झाल्यानंतर, आता वर्षाचे पहिले चंद्र ग्रहण लागणार आहे. 16 मे बुद्ध पूर्णिमेच्या (Buddha Purnima) दिवशी चंद्र ग्रहण (Lunar Eclipse)लागेल. ज्योतिषांच्या (Astrology) म्हणण्यानुसार ग्रहणाला शुभ घटना मानलं जात नाही. वैज्ञानिक दृष्टीने पाहिलं तर ग्रहण एक खगोलीय घटना आहे. जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा चंद्र ग्रहण लागते. ग्रहण तीन प्रकारचे असते. ज्योतिष विशेषतज्ञ डॉ. अरविंद मिश्र यांच्या मते हे पूर्ण चंद्र ग्रहण (Full Lunar Eclipse) असेल. हे भारतात दिसणार नाही.
चंद्र ग्रहणाच्या वेळी चंद्र वृश्चिक राशीत असेल. ग्रहणाच्या वेळी शनी आणि मंगळ दोन्ही एकत्र कुंभ राशीत असतील. अशात यावेळी वातावरणात बदल पाहायला मिळू शकते आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. पैर्णिमेच्या दिवशी दोन शुभ योग आहेत. सकाळी 06 वाजून 16 मिनिटांपर्यंत वरियान योग असेल. त्यानंतर 16 मेच्या सकाळीपासून दुसऱ्या दिवशी उशीर पर्यंत रात्री अडीज पर्यंत परिघ योग ही असेल. शुभ कार्यासाठी वरियान योग चांगला मानला जातो. तसंच परिघ योग शत्रुंना पराभूत करण्यासाठी कोणते कार्य केले तर ते सफल होते. येणारे चंद्र ग्रहण तीन राशींसाठी खूप फलदायी मानले जाते. जाणून घ्या तुमची रास तर यात नाही ना.

या तीन राशींसाठी चंद्रग्रहण शुभ

मेष

मेष राशीचे लोक कुठे गुंतवणूक करू इच्छितात तर पौर्णिमेच्या दिवशी करू शकतात. यादिवशी दोन्ही शुभ असणारे मेष राशीसाठी लाभकारी सिद्ध होतील. कौटू्ंबिक वाद विवाद सुटू शकतात. करिअरच्या दृष्टीने हा वेळ खूप चांगला ठरणार आहे. धन लाभाचे संकेत आहेत. तुमच्या प्रत्येक कामात जोडीदराची साथ मिळेल.

सिंह

नोकरीत प्रमोशन मिळण्याचे संकेत. लवकरच ही खुशखबर मिळू शकते. दांम्पत्य जीवन सुधारेल. इनकमचे नवे मार्ग मोकळे झाल्याने आनंदाची बातमी मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. लग्नासंबंधीत बोलणी सुरू असतील तर योग आहे.

धनु

धनु राशींच्या लोकांसाठी हा दिवस परिवर्तन घेवून येऊ शकते. नोकरीत प्रमोशन किंवा बदलाची स्थिती होवू शकते. त्याने धनसंपत्तीच्या बाबतीत तुम्हाला लाभ मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी फायदा होण्याचे संकेत आहेत. तुमच्या कामात कुटूंबातील लोकांचे पूर्ण सहकार्य मिळेल.