Chandrasekhar Bawankule : कोरोनाचं संक्रमण दूर व्हावं, रोगराई नाहीसी व्हावी, चंद्रशेखर बावनकुळे यांचं गणरायाला साकडं
माझे सर्वच नेत्यांशी चांगले संबंध आहे. त्यामुळे माझ्या भेटी या पारिवारिक आहेत. त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
नागपूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा झालीय. गेल्या 29 वर्षांपासून आमच्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा होतेय. बाप्पाच्या आगमनाने समृद्धीचं वातावरण परिवारात तयार होतंय. महाराष्ट्रात (In Maharashtra) शेतकऱ्यांवर आलेलं संकट दूर व्हावं. रोगराई दूर व्हावी, चांगले दिवस यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. राज्यातले शेतकरी (Farmers) सध्या अडचणीत आहेत. त्यांचे संकट दूर व्हावं. कुणीही आत्महत्या करु नये. गणरायाचे आगमन झाल्यावर ज्यांनी त्यांनी निष्ठेनं पूजा केली त्यांना गणराया (Ganaraya) सुखी ठेवतो, असं बावनकुळे म्हणाले.
पाहा बावनकुळे यांच्या घरच्या बाप्पाचं आगमन
नेत्यांच्या भेटी पारिवारिक संबंधाने
सरकारवरचं सर्वोच्च न्यायालयाची संकट दूर होणार का, या प्रश्नाची उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात निर्णय न्यायाधीश घेतात. तो निर्णय सर्वांना मान्य असतो. शिवाय माझे सर्वच नेत्यांशी चांगले संबंध आहे. त्यामुळे माझ्या भेटी या पारिवारिक आहेत. त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राज्य सुजलाम सुफलाम व्हावं
राज्याला सुजलाभ सुफलाम व्हावं. पु्न्हा या राज्यात रोगराई येऊ नये. राज्यात समृद्धी येवो. गणराया या राज्यातील जनतेला सुखी संपन्न होईल. या उत्सवातून सांस्कृतिक धार्मिक वातावरण तयार होते. नातेवाईक एकत्र येतात. राज्यातील 12 कोटी जनतेवर रोगराईचं संकट येऊ नये. शेतकरी संकटात येऊ नये. नटलेला, समृद्ध महाराष्ट्र राहू दे, अशी प्रार्थना त्यांनी केली. निसर्गाची अवकळा या राज्यावर येऊ नये, असंही त्यांनी सांगितलं.