राम मंदिरात लावली जाणार देशातील सर्वात मोठी घंटा, वजन तब्बल 21 क्विंटल
राम मंदिरासाठी 2100 किलो वजनाची घंटा 6 फूट उंच आणि 5 फूट रुंद आहे. घंटा घुंघरू-घंटी नगरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या जलेसरमध्ये तयार करण्यात आली आहे. ही घंटा प्राणप्रतिष्ठाच्या दिवशी 22 तारखेला राम मंदिर मध्ये लागणार आहे त्याच्यामध्ये विविध धात मिश्रित करून तयार करण्यात आले आहे
मुंबई : 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत भव्य राम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन होणार आहे. रामलल्लाच्या अभिषेकची तयारी जोरात सुरू आहे. असे सांगितले जात आहे की 22 जानेवारी 2024 रोजी अभिषेक झाल्यानंतर 48 दिवस मंडळ पूजा केली जाईल. देशातील विविध भागांतील रामभक्त आपापल्या पद्धतीने प्रभू रामाबद्दलची श्रद्धा व्यक्त करतील. याच क्रमाने 21 क्विंटल अष्टधातूची घंटा एटा जिल्ह्यातून रामललाच्या दरबारात पाठवली जात आहे. मंदिरांमध्ये लावल्या जाणाऱ्या घंटांमध्ये ही देशातील सर्वात मोठी घंटा असेल, असा दावा केला जात आहे. ही घंटा बनबण्यासाठी 25 लाख रुपये खर्च आला असून बनवण्यासाठी 400 कामगार कामाला लागले आहेत. गेल्या एक वर्षापासून अयोध्येच्या राम मंदिरासाठी जालेसरच्या मित्तल कारखान्यात ही घंटा तयार केली जात होती. 21 किलोची घंटा तयार करण्यासाठी कारागीर रात्रंदिवस काम करत होते. सध्या अष्टधातूची ही घंटा डिसेंबर महिन्याच्या अखेरीस अयोध्येच्या राम मंदिरात पोहोचवली जाईल.
अयोध्येतील राम मंदिरात सर्वात मोठी घंटा लावली जाणार आहे
आदित्य मित्तल यांनी सांगितले की, तीन महिने अहोरात्र काम करून ही घंटा तयार करण्यात आली आहे. ती बनवण्यासाठी सुमारे 25 लाख रुपये खर्च आला आहे. या भव्य घंटाची रुंदी 15 फूट असून आतील बाजूची रुंदी 5 फूट आहे. ते बनवण्यासाठी एक वर्ष लागले.
राम मंदिरासाठी 2100 किलो वजनाची घंटा 6 फूट उंच आणि 5 फूट रुंद आहे. घंटा घुंघरू-घंटी नगरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या जलेसरमध्ये तयार करण्यात आली आहे. ही घंटा प्राणप्रतिष्ठाच्या दिवशी 22 तारखेला राम मंदिर मध्ये लागणार आहे त्याच्यामध्ये विविध धात मिश्रित करून तयार करण्यात आले आहे त्याची ध्वनि 18 किलोमीटर पर्यंत जाणार हा घंटा सध्या कार्यशाळा मध्ये ठेवण्यात आलेला आहे याची माहिती महंत सरस्वती यांनी दिलेली आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराचा अभिषेक पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी सात हजार विशेष पाहुणे आणि चार हजार संतांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच या ऐतिहासिक सोहळ्याला जगभरातील 50 देश आणि सर्व राज्यांतील सुमारे 20 हजार लोक उपस्थित राहणार आहेत.