नागा साधूंच्या जटांचं रहस्य जाणून हैराण व्हाल, का कापत नाहीत केस?
नागा साधूंना पाहिल्यावर त्यांच्या जटांबद्दल नेहमीच आकर्षण वाटतं. नेमकी त्या जटांची काय भूमिका असते.हे जाणून घेण्याची उत्सुकताही असते. कधी कधी नक्कीच असा प्रश्न पडतो की नागा साधूंच्या जटाचं रहस्य नेमकं काय असतं. ते कधीच का त्यांच्या या जटा कापत नाही?

महाकुंभामुळे अनेक व्यक्ती प्रसिद्ध झोतात आले आहेत. महाकुंभातील अजून एक आकर्षण म्हणजे नागा साधू. त्यांचं दिसणं ते त्यांचा पेहराव, त्यांच्या गळ्यातील, हातात घातलेल्या माळा, अंगासा फासलेली राख हे सर्व पाहून सर्वजजण काहीसे लांब राहणंच पसंत करतात. तसेच नागा साधूंना असलेल्या जटांबद्दलही तेवढंच आकर्षण असतं. नेमकं त्यांच्या जटांचं रहस्य काय असतं आणि जटांना एवढं महत्त्व का दिल जातं? याबद्दल सर्वांनाच जाणून घेण्याची उत्सुकता असते.
नागा साधू जटा वाढण्यासाठी का सोडतात?
नागा साधू महिने आणि वर्षे ध्यानात असतात की ते आंघोळही करत नाहीत. केस लांब वाढतात. पाण्याअभावी जटा खूप जाड होतात. पण तुम्हाला माहिती आहे का नागा साधू केस का कापत नाहीत? ते त्यांच्या जटा वाढण्यासाठी का सोडतात?
खरं तर, केस न कापणे हे सांसारिक बंधने, इच्छा आणि भौतिक सुखांचा त्याग करण्याचं प्रतिक मानलं जातं. हा त्यांच्या साधना आणि तपश्चर्येचा एक भाग आहे. हिंदू मान्यतेनुसार, केस वाढवणे आणि जटा तयार होणे आध्यात्मिक ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते. ध्यान आणि योगामध्ये ते फायदेशीर मानले जाते. तर, केस आणि दाढी वाढू देणे हे त्यांचे निसर्गाशी असलेले नाते आणि जीवनातील साधेपणाचे प्रतीक आहे.
एवढंच नाही तर त्या जटा त्यांच्या शिवभक्तीचे आणि साधनेचे लक्षण मानले जाते. तसेच भगवान महादेवालाही जटाधारी म्हटलं जातं. महादेवाच्या लांब जटा आहेत. नागा साधू हे भगवान महादेवाची पूजा अर्चा करतात. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी ते लांब केस म्हणजेच जटा ठेवतात.
नागा साधू त्यांच्या वाढलेल्या जटा का कापत नाही?
काही नागा सांधूंच्या मते, त्यांनी केस कापले तर देवाचा कोप होतो. जटा कापल्या तर त्यांची भक्ती अपूर्ण राहते. त्यांनी कितीही तपश्चर्या केली, तरी त्याचे फळ त्यांना मिळत नाही, त्यामुळे नागा साधू हे कधीच केस कापत नाहीत.
नागा साधू बनण्याचे टप्पे
नागा साधू बनण्याची प्रक्रिया खूप लांब आणि अडचणींनी भरलेली असते. साधकांना पंथात सामील होण्यासाठी अंदाजे 6 वर्षे लागतात. नागा साधू होण्यासाठी, साधकांना तीन टप्प्यांतून जावे लागते. त्यांपैकी पहिला एक महापुरुष, दुसरा अवधूत आणि तिसरा दिगंबर असल्याचं मानलं जातं. नागा साधू बनलेले नवीन सदस्य अंतिम प्रतिज्ञा घेईपर्यंत फक्त लंगोटी घालतात. कुंभमेळ्यात अंतिम प्रतिज्ञा घेतल्यानंतर, ते लंगोटी सोडून देतात आणि आयुष्यभर दिगंबर राहतात. जेव्हा एखादी व्यक्ती नागा साधू बनते तेव्हा त्याचे केस पहिल्यांदाच कापले जातात. यानंतर, तो आयुष्यभर केस न कापता राहतो.
चार प्रकारचे नागा साधू असतात
कुंभमेळ्यात दीक्षा घेतलेल्या नागा साधूला राजेश्वर म्हणतात कारण त्याला संन्यासानंतर राजयोग प्राप्त करण्याची इच्छा असते. उज्जैन कुंभातून दीक्षा घेणाऱ्या संतांना खूनी नागा म्हणतात. त्यांचा स्वभाव खूपच आक्रमक असतो असं म्हटलं जातं. हरिद्वार येथून दीक्षा घेणाऱ्या नागा साधूंना बर्फानी म्हणतात, ते शांत स्वभावाचे असतात. नाशिक कुंभात दीक्षा घेणाऱ्या साधूला खिचडी नागा म्हणतात. त्यांचा कोणताही निश्चित स्वभाव नसतो असं म्हटलं जातं.