Vinayaki Chaturthi : श्रावणाच्या पहिल्या विनायक चतुर्थीवर असणार भद्रा योगाची सावली, रवि योगात अशा प्रकारे करा पूजा

चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाच्या आराधनेला विशेष महत्त्व आहे. श्री गणेशाला बुद्धीची देवता म्हंटल्या जाते. या शिवाय ते विघ्नहर्ता देखील आहेत. या दिवशी गणपतीची विशेष आराधना केल्याने साधकाच्या जीवनातला अंधःकार दूर होतो.

Vinayaki Chaturthi : श्रावणाच्या पहिल्या विनायक चतुर्थीवर असणार भद्रा योगाची सावली, रवि योगात अशा प्रकारे करा पूजा
गणपती बाप्पाImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 12:21 PM

मुंबई : हिंदू धर्मात, चतुर्थी तिथी (Vinayak Chaturthi Shrawan) भगवान गणेशाला समर्पित आहे. महिन्यातील दोन्ही चतुर्थीला उपवास केला जातो. यातील एक विनायक चतुर्थी आणि दुसरी संकष्टी चतुर्थी. श्रावण महिना (Shrawan 2023) सुरू झाला आहे. या महिन्याची विनायक चतुर्थी 21 जुलै 2023 रोजी येणार आहे. श्रावण महिन्याची विनायक चतुर्थी खूप खास असणार आहे. एकीकडे या दिवशी अतिशय शुभ रवियोग तयार होत आहे तर दुसरीकडे भद्राची सावलीही राहील.

श्रावण विनायक चतुर्थीला विशेष योग

श्रवणाच्या विनायक चतुर्थीला रवियोग तयार होत आहे, या दिवशी भाद्रची सावलीही राहील. विनायक चतुर्थीचे व्रत आणि श्रीगणेशाची आराधना केल्याने जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते. यासोबतच जीवनात सर्व संकटेही दूर होतात. विनायक चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहण्यास मनाई असते, त्यामुळे या दिवशी चंद्र पाहू नये.

विनायक चतुर्थी 2023 तिथी पूजा मुहूर्त

हिंदी दिनदर्शिकेनुसार, श्रावण अधिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 21 जुलैला सकाळी 6.58 वाजता सुरू होईल आणि 22 जुलैला सकाळी 9.26 वाजता संपेल. उदयतिथीनुसार, शुक्रवार, 21 जुलैला श्रावणातील पहिले विनायक चतुर्थी व्रत पाळण्यात येणार असून या दिवशी गणेशाची पूजा केली जाणार आहे. 21 जुलै 2023 रोजी सकाळी 11.05 ते दुपारी 01.50 पर्यंत विनायक चतुर्थीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सुमारे 2 तास असेल. या शुभ काळात लाभ-प्रगतीचा काळ आणि अमृत-उत्तम काळही आहे.

हे सुद्धा वाचा

चतुर्थीला रवि योग आणि भाद्र काल

श्रावणाच्या पहिल्या विनायक चतुर्थीच्या निमित्ताने 21 जुलैला दुपारी 1.58 ते 22 जुलै रोजी पहाटे 5.37 या वेळेत रवियोग असेल. या काळात शुभ कार्य करणे चांगले. दुसरीकडे, भद्रा 21 जुलैच्या रात्री 08:12 ते 22 जुलैच्या सकाळी 05:37 पर्यंत असेल. या भद्राचा वास पृथ्वीजगतात असल्याने या भाद्र काळात कोणतेही शुभ कार्य करू नये. या चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ रात्री 08:29 असेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.