नंदीच्या पुजेला आहे विशेष महत्त्व, नंदीच्या कोणत्या कानात करावी प्रार्थना?

शैव ग्रंथांमध्ये महादेवाचे वाहन नंदी हे भक्ती आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. नंदी हा भगवान शिवाच्या खास गणांपैकी एक आहे. शिवलिंगाची पूजा केल्यानंतर नंदीसमोर दिवा अवश्य लावावा.

नंदीच्या पुजेला आहे विशेष महत्त्व, नंदीच्या कोणत्या कानात करावी प्रार्थना?
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 8:29 PM

मुंबई : भोलेनाथांसोबतच त्यांच्या वाहन नंदीच्या पूजेलाही हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. प्रत्येक शिवालयात महादेवासमोर नंदीची मूर्ती (Nandi Puja) नक्कीच असते. महादेवाच्या दर्शनाप्रमाणेच नंदीचे दर्शन व पूजा करणे आवश्यक मानले गेले आहे. शैव ग्रंथांमध्ये महादेवाचे वाहन नंदी हे भक्ती आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. नंदी हा भगवान शिवाच्या खास गणांपैकी एक आहे. त्याचे एक रूप म्हणजे महिश, ज्याला आपण बैल देखील म्हणतो. मंदिरात शिवाच्या पूजेबरोबरच नंदीची पूजा केली पाहिजे, अन्यथा भगवान शंकराची पूजा करण्याचे पुण्य प्राप्त होत नाही, अशी श्रद्धा आहे.

नंदीची पूजा का केली जाते?

हिंदू धर्मात प्रत्येक मंदिरात भगवान भोलेनाथासमोर नंदीची पूजा करण्याचा नियम आहे. धार्मिक ग्रंथांनुसार, अनेकदा ध्यानात मग्न असलेल्या महादेवाने नंदीला आशीर्वाद दिला होता की, जर एखाद्या भक्ताने आपली इच्छा तुझ्या कानात सांगितली तर ती प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचेल. तेव्हापासून महादेव जेव्हा जेव्हा तपश्चर्या किंवा ध्यानात मग्न असत तेव्हा माता पार्वती नंदीच्या कानात आपले शब्द सांगत असे असे मानले जाते. म्हणूनच लोकं शिवाऐवजी नंदीच्या कानात आपल्या इच्छा बोलतात. नंदी हा शिव दरबाराचा द्वारपाल देखील मानला जातो. त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही महादेवापर्यंत पोहोचू शकत नाही.

शिवभक्त नंदी

हिंदू धर्मग्रंथांनुसार, हनुमानाचा ज्या प्रकारे भगवान रामाशी संबंध आहे, त्याचप्रमाणे नंदीचा संबंध भगवान शिवाशी आहे. ज्याप्रमाणे हनुमानाची पूजा केल्याने भगवान श्रीरामाचा आशीर्वाद प्राप्त होतो, त्याचप्रमाणे नंदीची पूजा केल्याने देवांचा देव महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणूनच शिवालयात प्रवेश करताना भोलेनाथासोबत नंदीचीही पूजा करावी.

हे सुद्धा वाचा

नंदीच्या कानात इच्छा सांगतांना हे नियम अवश्य पाळा

  1. शिवलिंगाची पूजा केल्यानंतर नंदीसमोर दिवा अवश्य लावावा. यानंतर नंदी महाराजांची आरती करा आणि कोणाशीही न बोलता नंदीच्या कानात तुमची इच्छा सांगा.
  2. नंदीच्या डाव्या कानात माणसाने आपली इच्छा सांगावी, असे मानले जाते. या कानात मनातली इच्छा सांगीतल्याने तुमची प्रार्थना महादेवापर्यंत पोहचते.
  3. जेव्हा तुम्ही तुमची इच्छा बोलता तेव्हा तुमचा चेहरा तुमच्या हातांनी झाकून घ्या जेणेकरून कोणीही तुमचे बोलणे ऐकू शकणार नाही. तुमची इच्छा गुप्त राहिली पाहिजे.
  4. नंदीला तुमची इच्छा सांगताना त्याच्यासमोर फळे, फुले, प्रसाद इत्यादी काही भेटवस्तू द्या.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.