Vastu tips: या दिवशी चुकूनही खरेदी करू नये मीठ, अन्यथा करावा लागू शकतो आर्थिक समस्येचा सामना
अशा काही गोष्टी आहेत ज्या चुकूनही तुम्ही शनिवारी खरेदी करू नयेत. असे केल्यास तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.
मुंबई, हिंदू मान्यतेनुसार, शनिवार (Saturday Vastu tips) हा शनिदेवाला समर्पित आहे. शनिदेवाला कर्माचा देव म्हटले आहे. असे अनेक किस्से ऐकायला मिळतात. ज्यामध्ये शनिदेवाला केवळ मानवच नाही तर देवांनाही भीती वाटत असल्याचे सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत कोणतेही काम करण्यापूर्वी शनिदेवाला प्रसन्न करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा काही गोष्टी आहेत ज्या चुकूनही तुम्ही शनिवारी खरेदी करू नयेत. असे केल्यास तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. त्याचप्रमाणे या विशेष दिवशी मीठ खरेदी करू नका, अन्यथा तुमचे काम बिघडू शकते.
या गोष्टी शनिवारी कधीही खरेदी करू नये
- तुम्ही काळी उडदाची डाळ किंवा तिची छोटी भाकरी दान करू शकता. असे मानले जाते की या दिवशी काळी मसूर खरेदी करू नये. हे उपाय केल्याने शनिदेवाचा प्रकोप टाळता येईल.
- या दिवशी मीठ हे आपल्या स्वयंपाकघरातली अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मात्र शनिवारी मिठ खरेदी करणे निशीद्ध मानण्यात आले आहे. असे मानले जाते की जे लोकं असे करतात त्यांच्या घरात गरिबी येते. अशा परिस्थितीत, आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की मीठ संपण्यापूर्वी खरेदी करा.
- जर तुम्ही चपला जोडे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे काम शनिवारी करू नका कारण असे केल्याने तुमचे काम बिघडू शकते आणि यशाऐवजी अपयश येऊ शकते.
- लोखंड किंवा लोखंडापासून बनवलेल्या वस्तू शनिवारी खरेदी करू नयेत. यादिवशी वाहन खरेदी पुढे ढकलावी. जे लोकं शनिवारी लोखंडी वस्तू खरेदी करतात, त्यांना लाभाऐवजी नुकसान होऊ शकते.
- या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. या दिवशी तुम्ही तेल दान देखील करू शकता. असे मानले जाते की या दिवशी मोहरीचे तेल खरेदी करू नये. ही चूक करणाऱ्यांना शारीरिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)