रोज पुजेत घंटी वाजवण्याचे आहेत अनेक फायदे, घंटीचे किती प्रकार आहेत?
घंटी वाजवण्याचे इतरही धार्मिक महत्त्व आहे, घंटी वाजवल्याने वातावरणात सकारात्मकता येते, ही बाब वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झाली आहे. साधारणपणे, आरती करताना..
मुंबई : अपण घंटीशिवाय मंदिराची कल्पना करू शकत नाही. हिंदू धर्मात पुजेमध्ये घंटीचे विशेष महत्त्व आहे. घंटी वाजवण्याचे इतरही धार्मिक महत्त्व आहे, घंटी वाजवल्याने वातावरणात सकारात्मकता येते, ही बाब वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झाली आहे. साधारणपणे, आरती करताना किंवा आरतीनंतर, लोक घंटी (Importance of Ghanta) वाजवतात आणि देवाला प्रार्थना करतात. पण घंटा किंवा घंटीवर कोणत्या देवतेचे चित्र कोरले आहे आणि हे चित्र बनवण्यामागचे कारण काय आहे, हे अनेकांना माहिती नाही.
विश्वाच्या निर्मितीमध्ये ध्वनीचे महत्त्व
पूजेत जी घंटी वाजवली जाते तिला गरुड घंटा म्हणतात. हिंदू धर्मानुसार, ज्या ध्वनीतून जगाची निर्मिती झाली, तो आवाज या गरुड घंटातून निघतो. म्हणूनच गरुड घंटीला खूप महत्त्व दिले गेले आहे. याशिवाय पूजा किंवा आरतीच्या वेळी घंटी वाजवल्याने आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
पुजेत होतो गरूड घंटीचा वापर
ज्या देवतेचे चित्र घर आणि मंदिरांच्या वरच्या टोकावर कोरलेले आहे ते गरुड भगवान आहेत. हिंदू धर्मात, गरुड देवतेचे वर्णन भगवान विष्णूचे वाहन म्हणून केले गेले आहे. घंटीमध्ये गरुड देवाचे चित्र कोरलेले असण्याचे कारण म्हणजे ते भगवान विष्णूच्या वाहनाच्या रूपात भक्तांना देवाचा संदेश देतात. म्हणूनच गरुडाची घंटा वाजवून प्रार्थना भगवान विष्णूपर्यंत पोहोचते आणि मनोकामना पूर्ण होतात. गरुड घंटा वाजवल्याने माणसाला मोक्ष मिळतो, असेही मानले जाते.
घंटांचे 4 प्रकार आहेत
घंटाबद्दल बोलायचे झाले तर मंदिरापासून घरापर्यंत 4 प्रकारच्या घंटा किंवा घंटी वापरल्या जातात. या 4 प्रकारच्या घंटा म्हणजे गरूड घंटी, द्वार घंटा, हात घंटा आणि मंदिरात लावतो ती घंटा. गरूड घंटा सर्वात लहान आहे, जी हाताने वाजवता येते. मंदिरांच्या प्रवेशद्वारावर दारावर घंटा किंवा घंटा टांगल्या जातात, त्या लहान किंवा मोठ्या अशा दोन्ही प्रकारच्या असतात. हाताची घंटा पितळेच्या गोल थाळीसारखी असते. लाकडी गादीवर मारून ती वाजवली जाते. याशिवाय ही घंटा खूप मोठी असते, तिची लांबी आणि रुंदी किमान 5 फूट असते आणि जेव्हा ती वाजवली जाते तेव्हा आवाज कित्येक किलोमीटर दूर जातो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)