हे पाच संकेत दर्शवितात लवकरच बदलणार आहे तुमचे भाग्य, लक्ष्मीची होणार कृपा
प्रत्त्येक परिस्थीती ही आपल्या कर्मावर आधारीत असते. अशी धार्मिक धारणा आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा काळ बदलणार असतो तेव्हा अनेक चिन्हे दिसतात.
मुंबई : सुख आणि दु:ख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दुःख भोगल्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही असे म्हाणतात. तज्ज्ञांच्या मते बदल हा जगाचा नियम आहे. सुखानंतर दु:ख आणि दुःखानंतर सुख हा बदल कायम असतो. याशिवाय प्रत्त्येक परिस्थीती ही आपल्या कर्मावर आधारीत असते. अशी धार्मिक धारणा आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा काळ बदलणार असतो तेव्हा अनेक चिन्हे दिसतात. जर तुम्हालाही हे संकेत (Lucky Signal) मिळत असतील तर समजून घ्या की तुमचे नशीब लवकरच बदलणार आहे. चला जाणून घेऊया या संकेतांबद्दल.
चांगले दिवस येण्याआधी मिळतात हे संकेत
- जर तुमच्या तळहाताला नेहमी खाज येत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमचा काळ लवकरच बदलणार आहे. ज्योतिषांच्या मते पुरुषांच्या उजव्या तळहाताला खाज येणे हे धनप्राप्तीचे लक्षण आहे. तर दुसरीकडे महिलांचा डावा हात खाजणे शुभ असते.
- तज्ज्ञांच्या मते, घरातून बाहेर पडताना कोणी झाडू मारताना दिसले तर ते शुभ चिन्ह आहे. याचा अर्थ तुमचा काळ लवकरच बदलणार आहे. यासोबतच तुम्हाला विशेष कामात यश मिळेल.
- मांजरीचे रडणे शुभ मानले जात नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी मांजरीचे रडणे हे काहीतरी अशुभ होण्याचे लक्षण आहे. मात्र, घरात मांजरीचे पिल्लू जन्माला येणे शुभ असते. तुमचे नशीब लवकरच बदलणार असल्याचे हे लक्षण आहे. माता लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे. धनलाभ होण्याचे हे संकेत आहेत.
- ज्योतिषांच्या मते घरात चिमण्या बसणे किंवा चिवचिवाट करणे शुभ असते. तुमच्या आयुष्यात आनंद येणार असल्याचे हे लक्षण आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर शुभ काळ येणार आहे.
- सनातन धर्मात भक्तीचा नियम आहे. लोकं आपल्या इष्ट देवतेची कृपा मिळविण्यासाठी भक्ती करतात. पूजेच्या वेळी अर्पण केलेले फूल अचानक पडले तर ते शुभ असते असे म्हणतात. देवाने तुमची उपासना स्वीकारल्याचे हे लक्षण आहे. तुमची मनोकामना लवकरच पुर्ण होऊ शकते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)