पूजेमध्ये वापरण्यात येणार्‍या ‘या’ 4 गोष्टी कधीही शिळ्या होत नाहीत, जाणून घ्या यामागील कारण

हिंदू धर्मात पूजा-अर्चनाचे विशेष महत्त्व आहे. पूजेच्या वेळी काही नियमांचे पालन करणे फार महत्वाचे आहे (These Four Things Never Stele). यामुळे देवी-देवता आनंदी होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

पूजेमध्ये वापरण्यात येणार्‍या 'या' 4 गोष्टी कधीही शिळ्या होत नाहीत, जाणून घ्या यामागील कारण
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 11:27 AM

मुंबई : हिंदू धर्मात पूजा-अर्चनेचे विशेष महत्त्व आहे. पूजेच्या वेळी काही नियमांचे पालन करणे फार महत्वाचे आहे (These Four Things Never Stale). यामुळे देवी-देवता आनंदी होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. पूजेच्या वेळी बऱ्याच प्रकारच्या गोष्टी वापरल्या जातात. परंतु शिळे पाणी, पाने आणि फुलं वापरणे निषिद्ध मानले जाते. पण काही वस्तू अशाही आहेत ज्या कधीही वापरल्या जाऊ शकतात. या गोष्टी कधीही शिळ्या मानल्या जात नाहीत. चला त्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया (These Four Things Never Stale Which Used To Worship God In Puja )-

गंगाजल

धार्मिक शास्त्रानुसार, शिळे पाणी पूजेमध्ये कधीही वापरले जात नाही. पण गंगेचे पाणी कधीही शिळे होत नाही. धार्मिक ग्रंथांमध्ये असे नमूद केले आहे की गंगेचे पाणी वर्षानुवर्षे खराब होत नाही. याचा उपयोग उपासनेत केला जाऊ शकतो. शुद्धीसाठी गंगा पाणी वापरले जाते.

बेलपत्र

शास्त्रामध्ये बेलपत्राचं खूप महत्त्व आहे. भगवान शिवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहेत. भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी बेलपत्र अर्पण केले जातात. बेलपत्र हे एक औषध म्हणूनही वापरलं जातं. आयुर्वेदात आरोग्याशी संबंधित समस्यांपासून मुक्त होण्यासाठी बेलपत्र वापरले जातो. एकदा बेलपत्र समर्पित केल्यानंतर ते पुन्हा धुऊन समर्पित केलं जाऊ शकते.

कमळाचे फूल

फुलांचे पूजेमध्ये विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की फुले अर्पण केल्याने देवी-देवता अत्यंत प्रसन्न होतात. परंतु शास्त्रात शिळे फुले अर्पण करणे निषिद्ध मानले जाते. परंतु धार्मिक शास्त्रात, कमळाचे फूल कधीही शिळे मानले जात नाही. आपण हे फूल धुवून पुन्हा अर्पण करु शकता. असे मानले जाते की कमळांचे फूल पाच दिवसांपर्यंत शिळं होत नाही.

तुळशीची पाने

धार्मिक मान्यतेनुसार तुळशीची पाने बेलपत्र आणि गंगाजल सारखी कधीच शिळी होत नाहीत. पूजेमध्ये आपण जुने तुळशीची पानेही वापरु शकता. जर आपण मंदिरातून तुळशीची पाने काढत असाल तर ते वाहत्या पाण्यात प्रवाहित करा. जर आपण हे करु शकत नसाल तर तुळशीची पाने कुंडील मातीच्या आत ठेवा. हे लक्षात घ्यावे की जेथे तुळशीची पाने असतील तेथे स्वच्छता असावी.

These Four Things Never Stale Which Used To Worship God In Puja

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Swapna Shastra : स्वप्नात या गोष्टी पाहणे असतं शुभ, स्वप्न शास्त्र काय म्हणते पाहुया

Turtle Ring | ‘या’ चार राशीच्या लोकांनी चुकूनही कासवाची अंगठी घालू नये, अन्यथा भोगावे लागतील दुष्परिणाम

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.