Turtle Ring | ‘या’ चार राशीच्या लोकांनी चुकूनही कासवाची अंगठी घालू नये, अन्यथा भोगावे लागतील दुष्परिणाम
कासवाला विजयाचे प्रतिक मानले जाते. वास्तू आणि फेंगशुई या दोन्हीमध्ये कासव घरात ठेवणे (Turtle Ring) शुभ मानले जाते. त्याचवेळी, धार्मिक कथांनुसार, कासव हा भगवान विष्णूचा अवतार आहे आणि हे आपल्या घरात आनंद आणि शांती घेऊन येते.
मुंबई : कासवाला विजयाचे प्रतिक मानले जाते. वास्तू आणि फेंगशुई या दोन्हीमध्ये कासव घरात ठेवणे (Turtle Ring) शुभ मानले जाते. त्याचवेळी, धार्मिक कथांनुसार, कासव हा भगवान विष्णूचा अवतार आहे आणि हे आपल्या घरात आनंद आणि शांती घेऊन येते. हेच कारण आहे की, बरेच लोक त्यांच्या घरात अनेक प्रकारच्या धातूंचा कासव ठेवतात. त्याचवेळी काही लोक कासवाची अंगठीही घालतात (These Four Zodiac Signs Should Not Wear A Turtle Ring In Their Life).
मान्यता आहे की कासवाची अंगठी घातल्याने आयुष्यात शांती, सौभाग्य आणि जीवनात समृद्धी येते. परंतु अशा काही राशी आहेत ज्यांनी कासवाची अंगठी घालू नये अन्यथा त्यांचे नशिब दुर्दैवात बदलण्यात फारसा वेळ लागणार नाही. म्हणून ते घालण्यापूर्वी एकदा ज्योतिषाचा सल्ला घ्या. ही अंगठी घातल्याने कोणते फायदे होतात आणि कोणत्या राशीने ही कासवाची अंगठी घालू नये, हे येथे जाणून घेऊ.
हे आहेत फायदे
ज्योतिषशास्त्रानुसार कासवाची अंगठी घातल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात. आत्मविश्वास वाढतो आणि नकारात्मकता जीवनातून निघून जाते. पौराणिक कथांमध्ये भगवान विष्णूच्या कच्छप अवताराचा उल्लेख आहे, म्हणून कासव भगवान विष्णूशी संबंधित आहे आणि असे मानले जाते की कुटुंबात आनंद, शांती आणि समृद्धी आणणारा मानला आहे. अशी मान्यता आहे की, कासवाची अंगठी घातल्याने व्यक्तीचं झोपलेलं भाग्यही जागं होते आणि तो आयुष्यात खूप प्रगती करतो. संपत्तीचे मार्ग उघडतात आणि सर्व दोष दूर होतात.
या चार राशींनी ही अंगठी घालू नये
जरी ही कासव अंगठी घालणे शुभ असेल, परंतु मेष, वृश्चिक, मीन आणि कन्या या चार राशीच्या लोकांनी ज्योतिषीय सल्ल्याशिवाय कधीही ही अंगठी घालू नये. अन्यथा त्यांचे जीवन उध्वस्त होऊ शकते. ते परिधान केल्याने करिअर कठीण होऊ शकते आणि व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. यामुळे कुटुंबात आर्थिक वाद निर्माण होत असून कुटुंबात भांडणे आणि क्लेश होण्याची परिस्थिती असते.
कुटुंबाचा आनंद, शांती आणि समृद्धीवर परिणाम होतो. या राशीचे लोक अंगठी घालण्याऐवजी त्यांच्या घरात कासव ठेवू शकतात. याचा त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर सकारात्मक परिणाम होईल.
Vastu Tips Health | सततचं आजारपण दूर करायचं असेल, तर या टिप्स ट्राय करा, समस्या होईल दूरhttps://t.co/SZ0l2EZxQS#VastuTips #Health
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 29, 2021
These Four Zodiac Signs Should Not Wear A Turtle Ring In Their Life
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Vaishakh Month | दु:ख-दारिद्र्य दूर करायचं असेल तर वैशाख महिन्यात हे उपाय करा, महादेवाची कृपा राहील