महाशिवरात्रीला केलेले हे उपाय सिध्द होऊ शकतात वरदान, धन धान्य आणि आरोग्यात होईल भरभराट
. हा दिवस एक विशेष तिथी बनत आहे कारण शिवरात्रीला शनि प्रदोष व्रत देखील येत आहे. या दिवशी केलेल्या पूजेचे महत्त्व अधिक असेल. शिवरात्रीच्या दिवशी पूजा करण्याव्यतिरिक्त काही उपाय आहेत जे खूप फायदेशीर आहेत.
मुंबई, हिंदू धर्मात महाशिवरात्रीच्या (Mahashivratri 2023) सणाला विशेष महत्व आहे. शिवपुराणानुसार महादेव आणि माता पार्वतीचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता. जो कोणी या विशेष दिवशी खऱ्या भक्ती आणि अंतःकरणाने त्यांची उपासना करतो, त्याचे सर्व दु:ख दूर होतात, असे मानले जाते. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. यावेळी ही तारीख 18 फेब्रुवारी 2023, शनिवारी येत आहे. हा दिवस एक विशेष तिथी बनत आहे कारण शिवरात्रीला शनि प्रदोष व्रत देखील येत आहे. या दिवशी केलेल्या पूजेचे महत्त्व अधिक असेल. शिवरात्रीच्या दिवशी पूजा करण्याव्यतिरिक्त काही उपाय आहेत जे खूप फायदेशीर आहेत. चला तर मग जाणून घेऊया या उपायांबद्दल.
उपाय-
- महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा करताना लक्षात ठेवा की, त्यांना जल अर्पण करण्यापूर्वी त्यात काळे तीळ मिसळावे. तीळ मिसळून शिव मंत्रांचा जप करा. असे केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात असे मानले जाते.
- महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांच्या रुद्राभिषेकालाही विशेष महत्त्व आहे. शक्य असल्यास या दिवशी दह्याने भोलेनाथाचा रुद्राभिषेक करण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने व्यक्तीच्या आर्थीक समस्या दुर होतात आणि जीवनात प्रगती होते. या सणाला शनिदेवाची पूजा करणे शुभ राहील. याशिवाय शिव चालीसा आणि शनि चालीसा पाठ करा. असे केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
- शिवरात्रीच्या दिवशी पूजा करताना बहुतेक लोक शिवलिंगाला चंपा किंवा केतकीची फुले अर्पण करतात. मात्र, असे करणे अजिबात शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की भगवान शिवाला शमी आणि बेलाची फुले आवडतात.
- भगवान शंकराच्या पूजेमध्ये जवसाच्या फुलाला विशेष महत्त्व आहे. भगवान शंकराच्या पूजेमध्ये लाल आणि पांढरी फुले विशेषतः अर्पण केली जातात. या वनस्पतीला मदार असेही म्हणतात. याशिवाय शिनवलिंगावर बेलपत्र, धतुरा आणि मध अर्पण करा.
- पूजेच्या वेळी भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करणे खूप महत्वाचे आणि शुभ मानले जाते. म्हणूनच महाशिवरात्रीला महामृत्युंजय मंत्राचा किमान 108 वेळा जप करण्याचा प्रयत्न करा. याशिवाय ‘ओम नमः शिवाय’ मंत्राचा जप करणे देखील शुभ आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)