Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Grah Dosh in Kundali : तुमच्या स्वयंपाक घरातील या गोष्टी तुमच्या कुंडलीतील दोष दूर करतील, वाचा सविस्तर

तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या सोप्या गोष्टींमुळे तुम्ही ग्रह दोषांपासून सहज सुटका मिळवू शकता.

Grah Dosh in Kundali : तुमच्या स्वयंपाक घरातील या गोष्टी तुमच्या कुंडलीतील दोष दूर करतील, वाचा सविस्तर
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 12:40 PM

जर तुमच्या कुंडलीत (Kundali) एखादा ग्रह कमजोर स्थितीत असेल तर त्याचे सर्व दुष्परिणाम तुमच्या जीवनावर पडत असतात. त्याचे भोग जीवनात भोगावे लागतात. तुमच्याही बाबतीत असे होत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या स्वयंपाकघरात  (Kitchen)असलेल्या सोप्या गोष्टींमुळे तुम्ही ग्रह दोषांपासून सहज सुटका मिळवू शकता.

विश्वात अनेक ग्रह असले तरी नऊ ग्रह मुख्य मानले गेले आहेत. त्यांना नवग्रह म्हणतात. या ग्रहांचा माणसाच्या जीवनावरही परिणाम होतो.जर तुमच्या कुंडलीत (Horoscope) ग्रह मजबूत स्थितीत असेल तर ते तुमच्या जीवनात शुभ परिणाम देते, परंतु जर ग्रह कमजोर असेल तर जीवनात अनेक समस्या येतात.ग्रहांची स्थिती सुधारण्यासाठी आपण किती पंडितांकडे फेऱ्या मारतो आणि त्याचे उपाय शोधतो. पण, नेमके उपाय हे कळत नाहीत. पण तुम्हाला माहित आहे का ग्रहांशी संबंधित अशा सर्व गोष्टी तुमच्या स्वयंपाकघरात असतात, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कमजोर ग्रहांचे स्थान सहज मजबूत करू शकता. यासाठी तुम्हाला काही विशेष प्रयत्न करण्याचीही गरज नाही. फक्त तुम्हाला माहित असले पाहिजे की तुम्हाला कोणता ग्रह मजबूत करायचा आहे. येथे जाणून घ्या नऊ ग्रहांशी संबंधित त्या नऊ गोष्टी, ज्याचे उपाय करून तुमच्या कुंडलीतील ग्रह दोष दूर होऊ शकतात.

सूर्य

सूर्याला ग्रहांचा राजा म्हटले जाते. असे मानले जाते की जर एखाद्याच्या कुंडलीत सूर्य बलवान असेल तर त्या व्यक्तीला करिअरमध्ये चांगली वाढ, मान-सन्मान आणि प्रसिद्धी मिळते. कोणत्याही गोष्टीची, संपत्तीची कमतरता राहत नाही. परंतु जेव्हा सूर्य कमजोर असतो तेव्हा त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. सूर्याची स्थिती मजबूत करण्यासाठी शुद्ध तूप, केशर, गहू यापासून बनवलेल्या वस्तूंचे दान करावे. रविवारी सकाळी लवकर स्नान करून सूर्याला अर्घ्य अर्पण करा. हे दान केल्यास लचांगले फळ प्राप्त होते.

हे सुद्धा वाचा

मंगळ

जर तुमच्या कुंडलीत मंगळ कमजोर स्थितीत असेल आणि यामुळे तुम्हाला सर्व समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही मंगळवारी हनुमानजींना पूजेच्या वेळी गोड पुऱ्या अर्पण कराव्यात. त्यासोबत दान ही करावे. यामुळे मंगळ मजबूत होतो.

बुध

बुध बळकट करण्यासाठी प्रत्येक बुधवारी धणे, बडीशेप, मूग डाळ, हिरव्या भाज्या इत्यादींचे दान करावे. यासोबतच गणेशाची पूजा करावी. गणपतीला दुर्वा अर्पण कराव्यात. यामुळे बुधाची स्थिती सुधारते.

गुरु

गुरु ग्रहाची स्थिती मजबूत करायची असेल तर गुरुवारी हळद, हरभरा डाळ, केळी इत्यादी पिवळ्या वस्तूंचे दान करा. भगवान विष्णूची पूजा करा. शक्य असल्यास गुरुवारी उपवास करा.

शुक्र

तुमच्या जीवनात ऐशोआराम देणारा ग्रह शुक्र आहे. शुक्राची स्थिती मजबूत करण्यासाठी शुक्रवारी दूध, दही, बत्तासे, खीर इत्यादी पांढर्‍या वस्तूंचे दान करा. जेवणात पांढऱ्या वस्तु खा.

शनि

शनि कुणाच्या बाजूने असेल तर तो माणसाला राजा बनवतो आणि कुणाच्या विरोधात असेल तर रंक बनवतो.. शनिदेवाला बळ देण्यासाठी शनिवारी काळे तीळ, काळी उडीद डाळ, मोहरीचे तेल दान करा.

चंद्र

चंद्र मजबूत करण्यासाठी पाणी पुरेसे आहे. यासाठी रोज रात्री चंद्राला जल अर्पण करावे. याशिवाय भांडे पाण्याने भरून ते डोक्यावर ठेवून झोपावे. सकाळी उठून बाभळीच्या झाडाच्या मुळाशी ठेवा. यामुळेही चंद्र बलवान होतो.

राहू

राहू हा सावलीचा ग्रह मानला जातो. राहूचे दोष टाळण्यासाठी मुळ्याच्या हिरव्या भाज्या काढून टाकल्यानंतर फक्त मुळा दान करा.

केतू

केतूचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी रोज कुत्र्याला पोळी किंवा भाकरी खायला घाला. दोन रंगाच्या कुत्र्याला खायला घातल्यास उत्तम.

(दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे. याबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही.)

आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण
आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण.
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल.
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार.
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका.
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे.
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?.
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद.
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण...
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण....