भिंतीवरी कालनिर्णय असावे म्हणत घराघरात पोहचणारे अवलिया ! ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांच्याबद्दल कधीही समोर न आलेल्या गोष्टी

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील मालवणमध्ये 1 फेब्रुवारी 1929 रोजी जन्मलेल्या जयंत शिवराम साळगांवकर (Jayant Salgaonkar)यांनी ज्योतिष, पंचांग आणि धर्मशास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय मोलाची कामगिरी केली. मॅट्रिकपर्यंत संस्कृतचे परंपरागत शिक्षण घेतलेल्या साळगांवकरांनी पंचांग आणि दिनदर्शिका यांचा उत्तम मेळ घालून कालनिर्णय हा नऊ भाषांतून प्रसिद्ध होणारा एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा ब्रँड निर्माण केला.

भिंतीवरी कालनिर्णय असावे म्हणत घराघरात पोहचणारे अवलिया ! ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांच्याबद्दल कधीही समोर न आलेल्या गोष्टी
jayant salgoakar
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 7:06 AM

मुंबई : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील मालवणमध्ये 1 फेब्रुवारी 1929 रोजी जन्मलेल्या जयंत शिवराम साळगांवकर (Jayant Salgaonkar)यांनी ज्योतिष, पंचांग आणि धर्मशास्त्र या क्षेत्रात उल्लेखनीय मोलाची कामगिरी केली.  साळगांवकरांनी पंचांग आणि दिनदर्शिका यांचा उत्तम मेळ घालून कालनिर्णय हा नऊ भाषांतून प्रसिद्ध होणारा एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा ब्रँड निर्माण केला. एकट्या मराठी भाषेत कालनिर्णय दिनदर्शिकेचा (calendar) खप 48 लाखांपेक्षा जास्त आहे. ही दिनदर्शिका 1973 पासून प्रसिद्ध होत आहे.कालनिर्णयचे संस्थापक-संपादक असलेल्या जयंतरावांनी ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्राविषयी विपुल लेखन करुन लोकांच्या मनातील गैरसमजुती आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणा-या विविध संस्थांच्या कार्यात ते उत्साहाने सहभागी होत. साळगावकर हे महाराष्ट्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सल्लागार होते. जयंत साळगावकर यांनी ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्राविषयी विपुल लेखन करून लोकांच्या मनातील गैरसमजुती आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांच्या कार्यात ते उत्साहाने सहभागी होत होते.

जयंत साळगांवकर यांचे सार्वजनिक क्षेत्रातील काम जयंत साळगांवकर यांनी अनेक संस्थांचे अध्यक्षपद भूषवले. श्री सिद्धिविनायक मंदिर, मुंबई ह्या संस्थेचे माजी ट्रस्टी होते. आयुर्विद्यावर्धिनी ह्या आयुर्वेदिक संशोधन करणाऱ्या ट्रस्टचे माजी अध्यक्ष. मुंबई मराठी साहित्य संघ ह्या संस्थेचे अध्यक्ष. श्रीगणेश महानिधी ह्या पत्रकारिता, सैनिकी शिक्षण आणि रंगभूमी ह्या क्षेत्रांत महत्त्वाचे काम करणाऱ्या ट्रस्टचे संस्थापक, अध्यक्ष. श्रीगणेश विद्यानिधी (पुणे) ह्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या ट्रस्टचे अध्यक्ष. महाराष्ट्र गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष होते. इतिहास संशोधन मंडळामध्ये अध्यक्ष. 1983 अखिल भारतीय ज्योतिष संमेलनाचे अध्यक्ष. मुंबई येथे झालेल्या 74 व्या नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष.

जयंत साळगांवकर यांच्या रचना

जयंत साळगांवकर यांनी अफाट लेखन केले. त्यामध्ये ‘सुंदरमठ’ (समर्थ रामदासस्वामींच्या जीवनावरील कादंबरी), ‘देवा तूची गणेशु’ (श्रीगणेश ह्या दैवताचा इतिहास आणि स्वरुप, तसेच समाजजीवनावरील त्याचा प्रभाव याचा अभ्यासपूर्ण आढावा). ‘धर्म-शास्त्रीय निर्णय’ ह्या ग्रंथाचे संपादन व लेखन. आतापर्यंत विविध सामाजिक, ऐतिहासिक, धार्मिक विषयावर दोन हजारांहून अधिक लेख प्रसिद्ध. त्यांनी ‘कालनिर्णय’या नऊ भाषेतून निघणा-या वार्षिक नियतकालिकाचे संस्थापक-संपादक पद भूषवले. ‘देवाचिये द्वारी’ (धार्मिक, पारमार्थिक अशा स्वरुपाचे लिखाण संतवाङमयाच्या आधाराने १९९५ मध्ये लोकसत्तात प्रकाशित झालेल्या ३०९ लेखांचा संग्रह). ‘दूर्वाक्षरांची जुडी’ (‘देवाचिये द्वारी’ १९९५-१९९९ मधील श्रीगणेशावरील लेखांचे संकलन)

त्यांना मिळालेले पुरस्कार जयंत साळगांवकर यांना ज्योतिर्भास्कर संकेश्वर पीठाच्या शंकराचार्यांनी परीक्षा घेऊन दिलेली पदवी मिळाली. ज्योतिषालंकार (मुंबईच्या ज्योतिर्विद्यालयातर्फे दिलेली सन्मानदर्शक पदवी). ज्योतिमार्तंड (पुण्याच्या ज्योतिष संमेलनात दिलेली सन्मानदर्शक पदवी). महाराष्ट्र ज्योतिष विद्यापीठाने दिलेली विद्यावाचस्पती (डी.लिट्) ही बहुमानाची पदवी.

संबंधीत बातम्या :

Chanakya Niti | रिस्क हैं तो इश्क हैं ! व्यवसाय सुरू करताय? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 5 गोष्टी पाहाच

Vastu Tips | घरात या ठिकाणी बसून जेवण केल्यास फटका बसणार, दारिद्र्याच्या दिशेनं वाटचाल ठरलेली!

Chanakya Niti : जन्मापूर्वीच तुमच्या नशिबात ‘या’ गोष्टी लिहिलेल्या असतात, जाणून घ्या याबद्दल!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.