एक कोटीच्या बंगल्यात राहते ही गाय, खाते शुद्ध तुपातले लाडू, सुरक्षेसाठी लावले आहेत CCTV कॅमेरे
एक अशी गाय जी एक कोटीच्या बंगल्यात राहते, शुद्ध तुपातली लाडू खाते. घरचे लोकं या गाईची रात्रंदिवस पूजा करतात. इतकेच काय तर तिच्या सुरक्षेसाठी CCTV देखील लावण्यात आले आहेत.
जालोर, राजस्थानमधील जालोर येथे राहणारे व्यापारी नरेंद्र पुरोहित (Narendra Purohit) हे अनेक वर्षांपासून गायींच्या निवाऱ्याशी संबंधित होते. जिथे ते गायींच्या संगोपनात हातभार लावत असे. एके दिवशी नरेंद्र पुरोहित यांनी दंतशारनंद महाराजांच्या आज्ञेने दोन वर्षांच्या गाईला दत्तक घेतले. त्यांनी तिचे नाव राधा ठेवले (Radha Cow). गाईला घरी आणताच व्यवसाय वाढला. वाईट दिवस अचानक पालटले. यानंतर संपूर्ण कुटुंब राधाचे भक्त बनले आणि राधा त्यांच्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग बनली. राधाला जेवणात देशी तुपापासून बनवलेले लाडू दिल्या जातात. याशिवायच तिचा चार देखील दिला जातो. राधाला बंगल्यात (live in bungalow) कुटुंबासोबत खायला आवडते.
रात्रंदिवस होते पूजा
उद्योगपती नरेंद्र पुरोहित यांनी सांगितले की, “दोन वर्षांपूर्वी जालोरमध्ये एक कोटी रुपये खर्च करून बंगला बांधण्यात आला. यामध्ये राधासाठी विशेष जागा बनविण्यात आली आहे. ती बंगल्यातील प्रत्येक खोलीत फिरते. तिला पाहिजे तिथे बसते. कुटुंबातील सदस्य तिची सेवा करतात. रात्रंदिवस तिची पूजा करतात.
10 लिटर दूध देते राधा
पुरोहित यांनी सांगितले की, राधाला तीन बछडे झाले. त्यांची नावे मीरा, सोमा आणि गोपी ठेवली. राधा रोज 10 लिटर दूध देते, त्यापैकी फक्त अडीच लिटर दूध घरात वापरले जाते आणि बाकीचे तिच्या बछड्यांसाठी सोडले जाते.
राधाच्या आगमनानंतर व्यवसाय वाढू लागला
नरेंद्र पुरोहित हे मुंबईतील बीएमसीमध्ये कंत्राटदार आहेत. त्यांचा इलेक्ट्रिक दुचाकी वाहने बनवण्याचा व्यवसाय आहे. नरेंद्र सांगतात की, त्यांना लहानपणापासून गायी पाळण्याची आवड होती. त्यांनी राधाला घरी आणले तेव्हा व्यवसायात खूप वाढ झाली होती.
पत्नी विमला पुरोहित, मुली सपना, निकिता आणि दोन मुले परेश आणि अभिजीत रोज राधाची आरती करतात. डीचे दर्शन घेल्याशिवाय अन्नही खात नाहीत. इतकेच काय तर पुरोहित जेव्हा व्यवसायासाठी बाहेर जातात तेव्हा ते व्हिडिओ कॉलद्वारे राधाची भेट घेतात.
राधाच्या सुरक्षेसाठी बंगल्यात बसवले सीसीटीव्ही
राधाच्या सुरक्षेसाठी बंगल्यात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. नरेंद्र पुरोहित यांनी सांगितले की, एकदा राधा खूप आजारी पडली होती. तिच्यावर अनेक ठिकाणी उपचारही करण्यात आले, तिच्या जगण्याची शक्यता फारच कमी होती.
मग त्यांनी भगवान श्रीकृष्णाची प्रार्थना केली आणि हळूहळू राधाची प्रकृती सुधारू लागली. त्यांनी सांगितले की, पथमेडा गोशाळेचे संस्थापक दंतशरानंद महाराज यांच्या प्रेरणेने त्यांनी सुरभी नावाच्या इलेक्ट्रिक दुचाकीचे उत्पादन सुरू केले आहे. राधा सुरभी जातीची गाय आहे. व्यवसायात चांगली वाढ झाली, त्यामुळे ते दरवर्षी लाखो रुपये गौसेवेत खर्च करतात.