‘न टाटा न बिरला..’ राम मंदिर निर्माणासाठी या व्यक्तीने दिले सर्वाधिक दान
या राम भक्ताने 101 किलो सोने दान केले आहे. या सोन्याचा वापर राम मंदिराच्या दरवाजांना सोन्याने लेप करण्यासाठी केला गेला आहे. हे दान राम मंदिराला मिळालेले सर्वात मोठे दान आहे. हे 101 किलो सोने राम मंदिराचे दरवाजे, गर्भगृह, त्रिशूळ आणि खांब पॉलिश करण्यासाठी वापरले जात आहे.
अयोध्या : अयोध्येत आज रामललाचा प्राण प्रतिष्ठापणेचा (Ramlala Pranpratistha) सोहळा पार पडला. यासाठी अयोध्या नगरी सर्व वधूच्या पोशाखात सज्ज झाली आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सचिव नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, राम मंदिर पूर्णतः रामभक्तांनी दिलेल्या देणगीतून बांधले गेले आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी सरकारने एक पैसाही दिलेला नाही. दरम्यान, एक व्यक्ती अशी आहे की ज्याने देणगीच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. राम मंदिरासाठी त्यांनी सर्वाधिक दान दिले आहे. सुरतचे हिरे व्यापारी दिलीप कुमार लाखी यांनी 101 किलो सोने दान केले आहे. या सोन्याचा वापर राम मंदिराच्या दरवाजांना सोन्याने लेप करण्यासाठी केला गेला आहे. हे दान राम मंदिराला मिळालेले सर्वात मोठे दान आहे. हे 101 किलो सोने राम मंदिराचे दरवाजे, गर्भगृह, त्रिशूळ आणि खांब पॉलिश करण्यासाठी वापरले जात आहे. तळमजल्याशिवाय एकूण 14 सोन्याचा मुलामा असलेले लावण्यात आले आहेत. आजच्या किंमतीनुसार 101 किलो सोन्याची किंमत पाहिली तर ती 68 हजार रुपये आहे. त्यानुसार दिलीप कुमार यांनी 68 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. जो एक विक्रम आहे.
मोरारी बापूही मागे नाहीत
दिलीप कुमार यांच्यानंतर कथाकार मोरारी बापू यांनी सर्वाधिक देणगी दिली आहे. मोरारी बापूंनी राम मंदिरासाठी 11.3 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. याशिवाय अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडात असलेल्या त्यांच्या भक्तांनीही 8 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. गुजरातचे हिरे व्यापारी गोविंदभाई ढोलकिया यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी 11 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
पाटणाचे महावीर मंदिरही देणगीत पुढे आहे
मंदिरांबद्दल बोलायचे झाले तर पाटणाचे महावीर मंदिर देणगीच्या बाबतीत अव्वल आहे. पाटण्याच्या महावीर मंदिराने राम मंदिरासाठी 10 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. आतापर्यंत मंदिराने 8 कोटी रुपयांची देणगी दिली होती. रविवारी महावीर मंदिर ट्रस्टच्या सचिवांनी श्री रामजन्मभूमी मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांना 2 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.