भारतातल्या या ठिकाणी आहे सर्वात मोठे शिवलींग, इंद्रदेवाशी आहे या देवस्थानाचा संबंध

हे मंदिर स्वामी संभा शिवमूर्ती आणि त्यांची पत्नी व्ही रुक्मिणी यांनी 1980 मध्ये बांधले होते. याच वर्षी येथे पहिल्या शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. सुरुवातीच्या काळात पंचलिंगांची स्थापना झाली, त्यानंतर 101 शिवलिंगांची आणि नंतर 1001 शिवलिंगांची स्थापना झाली. 1994 मध्ये या संकुलात विक्रमी 108 फूट शिवलिंगाची स्थापना करण्यात आली.

भारतातल्या या ठिकाणी आहे सर्वात मोठे शिवलींग, इंद्रदेवाशी आहे या देवस्थानाचा संबंध
कोटीलिंगेश्वर
Follow us
| Updated on: Feb 07, 2024 | 1:39 PM

मुंबई : कर्नाटकातील कोल्लार जिल्ह्यातील कम्मासांद्र नावाच्या गावात भगवान भोलेनाथाचे विशाल शिवलिंग स्थापित केले आहे. हे विशाल शिवलिंग मंदिर जगभर कोटिलिंगेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. येथील मंदिराचा आकार शिवलिंगाच्या (Biggest Shivlinga)  रूपात आहे. शिवलिंगाच्या रूपातील या मंदिराची उंची 108 फूट आहे. भारत सरकारने ते आशियातील सर्वात उंच शिवलिंग घोषित केले आहे. या मुख्य शिवलिंगाभोवती अनेक शिवलिंगांची स्थापना केली आहे. या मंदिरात भक्त त्यांच्या भक्ती आणि क्षमतेनुसार त्यांच्या नावाने 1 ते 3 फूट शिवलिंगाची प्रतिष्ठापना करतात.

1994 मध्ये येथे 108 फूट शिवलिंगाची स्थापना करण्यात आली

हे मंदिर स्वामी संभा शिवमूर्ती आणि त्यांची पत्नी व्ही रुक्मिणी यांनी 1980 मध्ये बांधले होते. याच वर्षी येथे पहिल्या शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. सुरुवातीच्या काळात पंचलिंगांची स्थापना झाली, त्यानंतर 101 शिवलिंगांची आणि नंतर 1001 शिवलिंगांची स्थापना झाली. 1994 मध्ये या संकुलात विक्रमी 108 फूट शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. यासोबतच मंदिर परिसरात भव्य आणि उंच नंदीची स्थापना करण्यात आली आहे. मंदिरात कोटी लिंगाची स्थापना करण्याचे स्वामीजींचे स्वप्न होते आणि ते त्यावर काम करत होते. 14 डिसेंबर 2018 रोजी स्वामीजींच्या निधनानंतर त्यांच्या मुलीने आणि मुलाने जबाबदारी स्वीकारली आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून मंदिरात अनेक शिवलींगांची स्थापना करण्यात आली आहे.

देवराज इंद्राने केली होती स्थापना

या मंदिरात पूजा केल्याने माणसाची सर्व पापे धुतली जातात, असे मानले जाते. अशीही एक मान्यता आहे की जेव्हा भगवान इंद्राला गौतम नावाच्या ऋषींनी शाप दिला होता. म्हणून या शापापासून मुक्ती मिळावी म्हणून त्यांनी कोटिलिंगेश्वर मंदिरात शिवलिंगाची स्थापना केली. शापापासून मुक्ती मिळावी म्हणून इंद्राने शिवलिंगाचा अभिषेक केला होता, असे म्हणतात.

हे सुद्धा वाचा

इतर देवी-देवतांची 11 मंदिरेही आहेत

कोटिलिंगेश्वराच्या मुख्य मंदिराशिवाय या संपूर्ण मंदिर परिसरात आणखी 11 मंदिरे आहेत, ज्यामध्ये ब्रह्माजी, विष्णूजी, अन्नपूर्णेश्वरी देवी, व्यंकटरमणी स्वामी, पांडुरंगा स्वामी, पंचमुख गणपती, राम-लक्ष्मण-सीता यांची मंदिरे ठळकपणे आहेत.

नंदीचे विशाल रूप

या विशाल शिवलिंगासमोर नंदी भव्य आणि विशाल स्वरूपात प्रकट होतो. नंदीची ही मूर्ती 35 फूट उंच, 60 फूट लांब, 40 फूट रुंद असून, ती 4 फूट उंच आणि 40 फूट रुंद व्यासपीठावर बसवण्यात आली आहे. या विशाल शिवलिंगाभोवती माता देवी, श्री गणेश, श्री कुमारस्वामी आणि नंदी महाराज यांच्या मूर्ती बसवल्या आहेत जणू ते आपल्या देवतेची पूजा करत आहेत.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.