मुंबई : आजच्या युगात क्वचितच अशी व्यक्ती असेल ज्याला कोणतीही समस्या नाही. प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रासलेला असतो आणि त्यासाठी तो उपाय शोधत राहतो. ज्योतिषशास्त्रामध्ये (Astrology) व्यक्तीच्या अनेक समस्यांवर उपाय सांगितले आहेत, ज्याचा अवलंब करून माणूस साधे जीवन जगू शकतो. चला तर मग अशाच काही उपायांबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे तुमची समस्यांपासून लवकरच सुटका होऊ शकते.
ज्योतिषाचार्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक व्रत, विधी, पूजा करताना सर्वप्रथम तेथे दिवा लावला जातो, कारण दिवा लावल्याने सकारात्मक वातावरणाचा संचार होतो. आम्ही तुम्हाला सांगतो की पिठाचा दिवा सर्व प्रकारच्या दिव्यांमध्ये सर्वात शुद्ध आणि पवित्र मानला जातो.
देवतांच्या पूजेमध्ये पिठाचा दिवा लावल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात असे सांगितले जाते. पिठाचा दिवा लावल्याने तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात, पण कोणता पिठाचा दिवा कोणता प्रश्न सोडवतो आणि तो कुठे लावावा. चला जाणून घेऊया
1. गव्हाच्या पिठाचा दिवा मानसीक शांतता प्राप्त होते.
2. उडीद पिठाचा दिवा लावल्यास हितशत्रू दुर राहातात.
3. मुगाच्या पिठाचा दिवा लावल्याने कुटुंबात शांती नांदते.
कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी कमी किंवा वाढत्या क्रमाने पिठाचे दिवे लावले जातात. उदाहरणार्थ, 11 दिवस, 21 दिवस आणि 31 दिवस. ज्योतिष शास्त्रात पिठाच्या दिव्यांचा क्रम अशा प्रकारे सांगितला आहे. पूजेत पिठाचा दिवा कुठल्यातरी साधनेसाठी किंवा सिद्धीसाठी वापरला जातो. पैशाची कमतरता किंवा आर्थिक संकट असलेल्या व्यक्तीने दररोज मंदिरात जाऊन शुद्ध तुपाचा दिवा लावावा. यामुळे देवदेवता प्रसन्न होतात, असे मानले जाते. शत्रूपासून वाचण्यासाठी भैरवजींच्या मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)