Thursday Astro Tips | कुंडलीत गुरु दोष असेल तर गुरुवारी हे उपाय करा
त्याउलट, जर कुंडलीत गुरु दोष ( Guru Dosh) असेल तर लग्नाला उशिर होतो आणि ज्यांचे लग्न झाले आहे त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या येतात. नशीब अनुकूल नसते आणि व्यक्ती जास्त आशावादी बनून मूर्खपणे वागतो. अशा लोकांना मधुमेहाच्या आजाराचा सामना करावा लागतो.
मुंबई : बृहस्पति ग्रहाला देव गुरु म्हणतात (Guru). मान्यता आहे की जर कुंडलीत देव गुरु बृहस्पति मजबूत स्थितीत असेल तर त्या व्यक्तीचे नशीब चमकते. त्याच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर तेज असते. ती व्यक्ती आपल्या ज्ञानासमोर कोणालाही झुकविण्यास समर्थ असते. असे लोक आयुष्यात मोठी प्रगती करतात आणि इतरांसाठी प्रेरणास्थान बनतात. त्याच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता नसते. गुरु त्या व्यक्तीला धर्म आणि अध्यात्माचा मार्ग दाखवितो आणि नम्र स्वभावाचा व्यक्ती बनवतो (Thursday Astro Tips Do These Upay On Thursday For Guru Dosh).
त्याउलट, जर कुंडलीत गुरु दोष असेल तर लग्नाला उशिर होतो आणि ज्यांचे लग्न झाले आहे त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या येतात. नशीब अनुकूल नसते आणि व्यक्ती जास्त आशावादी बनून मूर्खपणे वागतो. अशा लोकांना मधुमेहाच्या आजाराचा सामना करावा लागतो. आपल्या जन्मकुंडलीतील बृहस्पतिचे दोष दूर करण्यासाठी आणि बृहस्पतिला मजबूत करण्याचे मार्ग येथे जाणून घ्या.
1. गुरु ग्रहाचा दोष संपवण्यासाठी गुरुवारी स्नान करण्यापूर्वी चिमूटभर हळद पाण्यात घाला आणि या पाण्याने स्नान करावे. यानंतर ‘ओम नमो भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा जप करावा आणि कपाळावर भगवा टिळक लावाला. यानंतर केळीच्या झाडावर पाणी आणि धूप दीप अर्पण करा.
2. गायत्री मंत्र हा एक अत्यंत शक्तिशाली मंत्र मानला जातो. जर तुम्ही कोणालाही गुरु केले नसेल तर तुम्ही नियमितपणे 108 वेळा गायत्री मंत्राचा जप करावा. याद्वारे, केवळ आपला गुरुच नाही तर सूर्य ग्रह देखील मजबूत होईल आणि जीवनातील सर्व समस्या आपोआप दूर होतील.
3. ‘ओम ह्रीं ह्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी वासुदेवाय नमः’ हा मंत्र पिवळ्या हाकिकच्या माळेन जपा. जर आपण दररोज हे करु शकत नसाल तर किमान गुरुवारी करा. याद्वारे तुम्हाला देव गुरु बृहस्पतिंचे आशीर्वाद प्राप्त होतील.
4. एखाद्या मंदिरात गरजू मुलांना पुस्तके दान करा आणि एखाद्या गरीब व्यक्तीला चणा डाळ दान करा. असे केल्याने गुरुची स्थिती बळकट होते.
5. कुंडलीत गुरु दोष असल्यास, ते दूर करण्यासाठी गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि भगवान विष्णूची पूजा करावी आणि विष्णू सहस्रनामाचे पठन करावे.
Shanidev | कुंडलीत असेल शनि, तर शनिवारी हे उपाय करा, शारीरिक आणि मानसिक समस्या सुटतीलhttps://t.co/f2UDclvI4Q#SHANIDEV #SaturdayAstroTips #ShaniwarUpay
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 3, 2021
Thursday Astro Tips Do These Upay On Thursday For Guru Dosh
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Budh Pradosh Vrat 2021 | बुध प्रदोष व्रताला महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा
Ashadha Amavasya 2021 | जर कुंडलीत पितृ दोष असेल तर अमावस्येला ही झाडं लावा…