Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tirumala Tirupati | निसर्गाच्या सौंदर्यात विराजमान झालेल्या श्रीमंत तिरुपतीच्या भेटीला आज 20 हजार भाविकांची मंदियाळी

कोविड-19 लागलेले निर्बंध हटवल्यामुळे तिरुमला तिरुपती देवस्थानममध्ये भाविकांची संख्या वाढली आहे . यामुळे तिरुमाला तिरुपती देवस्थान (TTD)ने सर्व दर्शनाची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे .

Tirumala Tirupati | निसर्गाच्या सौंदर्यात विराजमान झालेल्या श्रीमंत तिरुपतीच्या भेटीला आज 20 हजार भाविकांची मंदियाळी
Tirupati-Temple-Tirupati
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 9:14 AM

मुंबई : कोविड-19 लागलेले निर्बंध हटवल्यामुळे तिरुमला तिरुपती देवस्थानममध्ये भाविकांची संख्या वाढली आहे . यामुळे तिरुमाला तिरुपती देवस्थान (TTD)ने सर्व दर्शनाची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे . आज व्यवस्थापन ऑफलाइन बुकिंगसाठी 20 हजार एसएसडी तिकिटांव्यतिरिक्त 300 रुपयांच्या 25000 तिकिटे जारी करण्यात येतील अशी माहिती देवस्थानाने दिली आहे. तिरुमला तिरुपती मंदिरात दररोज 15,000 ऑफलाइन टोकन दिले जातात. गेल्या आठवड्यापासून, मंदिरात दररोज 15,000 ऑफलाइन सर्वदर्शन टोकन जारी करत आहे. कोरोना निर्बंध उठवल्यानंतर हळूहळू सामान्य स्थितीत येत आहे. तिरुपतीला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अतिरिक्त यात्रेकरूंना सामावून घेण्यासाठी (TTD) अतिरिक्त व्यवस्था करत आहे. जेव्हा भक्तांची संख्या सर्वदर्शन टोकनच्या दैनंदिन कोट्यापेक्षा जास्त होते, तेव्हा (TTD) पुढील दिवसांसाठी भक्तांना तिकिटे जारी करते.

1-21 फेब्रुवारी दरम्यान दर्शकसंख्येमध्ये 50% वाढ 1 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी दरम्यान तिरुपती देवस्थानला भेट देणाऱ्या भाविकांच्या संख्येत सुमारे 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 1 फेब्रुवारी रोजी सुमारे 29,000 भाविकांनी पवित्र मंदिराचे दर्शन घेतले होते. 21 फेब्रुवारी रोजी ही संख्या 39,000 च्या पुढे गेली.

2022-23 च्या वार्षिक महसूल अंदाजे 3096 कोटी रुपये तिरुमला तिरुपती देवस्थानाने 2022-23 चा अर्थसंकल्प सादर केला. तिरुमलाच्या प्राचीन भगवान वेंकटेश्वर मंदिराच्या प्रशासकीय मंडळाने 2022-23 च्या वार्षिक बजेटमध्ये 3,096.40 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा अंदाज व्यक्त केला आहे.

याशिवाय तिरुपती देवस्थानाला निवास आणि विवाह हॉलच्या भाड्यातून 95 कोटी रुपये आणि भाविकांनी अर्पण केलेल्या केसांच्या विक्रीतून 126 कोटी रुपये मिळतील असा अंदाज आहे. त्याचप्रमाणे विविध तिकिटांच्या विक्रीतून ३६२ कोटी रुपये आणि ‘लाडू प्रसादम’च्या विक्रीतून ३६५ कोटी रुपयांचा महसूलाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Chanakya Niti : आयुष्यामध्ये यशाची शिखरे गाठायची असतील तर ‘या’ 5 लोकांपासून दोन हात लांबच राहा!

Rashifal : ‘या’ 3 राशींच्या लोकांच्या डोक्याचा ताप वाढण्याची शक्यता, खर्चावर लगाम ठेवा!

Vastu tips : नात्यामधील सततचे तणाव दूर करण्यासाठी बेडरूममध्ये ठेवा या गोष्टी आणि गोडवा वाढवा!

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.