Chaturthi: आज संकष्ट चतुर्थी, या दिवशी केलेल्या सोप्या उपायांनी लाभेल सुख समृद्धी
आज संकष्टी चतुर्थी आहे. चतुर्थी ही तिथी गणपतीला समर्पित आहे. या दिवशी केलेल्या काही उपायांमुळे सुख-समृद्धी लाभते
मुंबई, पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी तिथी असतात. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi) आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi) म्हणतात. आज संकष्टी चतुर्थी आहे. चतुर्थी तिथी ही गणपतीला (Ganpati) समर्पित आहे. या दिवशी गणेशाची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते. गणरायाच्या कृपेने ज्ञान आणि संपत्ती प्राप्त होते. त्याचबरोबर भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
संकष्टी चतुर्थी व्रताचे नियम
संकष्टी चतुर्थी म्हणजे अडथळे नष्ट करणारी चतुर्थी. संस्कृतमधील संकष्टी या शब्दाचा अर्थ अडचणीपासून मुक्तता असा होतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करून उपवास ठेवला जातो. संकष्टी चतुर्थीला लोक सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास करतात.
संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त
पंचांगानुसार यावेळी कार्तिक महिना सुरू आहे. या महिन्याची संकष्टी चतुर्थी 12 नोव्हेंबर 2022 रोजी आहे. चतुर्थी तिथी 11 नोव्हेंबर रोजी रात्री 10.25 वाजता सुरू होईल आणि 12 नोव्हेंबर रोजी रात्री 08.17 वाजता समाप्त होईल. उदय तिथीमुळे 12 नोव्हेंबर रोजी संकष्टी चतुर्थी साजरी होणार आहे. चंद्रोदयाची वेळ रात्री 8.21 आहे. 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 08.02 ते 09.23 पर्यंत संकष्टी चतुर्थी पूजेचा शुभ मुहूर्त आहे. याशिवाय दुपारी 01.26 ते 04.08 ही वेळ शुभ आहे.
या उपायांनी होईल मनोकामना पूर्ण
- काही विशेष मनोकामनापुरतीसाठी गणपतीची विधिपूर्वक पूजा करून गणपतीला शेंदूर अर्पित करावे. गूळ- खोबर्याचे नैवेद्य दाखवावे.
- ऊर्जावान वाटावे यासाठी गणपतीला प्रार्थना करून 108 वेळा श्री गणेशाय नम: या मंत्राचा जप करावा. तसेच पूजेनंतर गणपतीला जास्वंदाचे फुल अर्पित करावे.
- सौभाग्य प्राप्तीसाठी मातीच्या भांड्यात अख्खे हिरवे मूग टाकून मंदिरात दान करावे. याने सुख- सौभाग्यात वृद्धी होते.
- उज्ज्वल भविष्याची आस असल्यास गणपतीसमोर कापूर जाळून ऊँ गं गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा.
- तसेच एकच काम अनेकदा करण्याचा प्रयत्न करत असला आणि यश हाती लागत नसेल, प्रत्येकावेळी काही अडथळे निर्माण होत असतील तर कुमारिकेचा आशीर्वाद मिळवण्याची गरज आहे. चतुर्थीला कुमारिका पूजन करून तिला काही भेटवस्तू द्यावी. आपल्याला कामात यश मिळेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)