घरात लागले असतील एकापेक्षा जास्त तुळशीचे रोप, तर या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष
बहुतेक घरांमध्ये तुळशीचे रोप असते. पण कधी कधी रोपातून गळून पडलेल्या बियांपासून अनेक रोप उगवतात. त्यामुळे एकापेक्षा जास्त तुळशीची रोपे आपोआपच लागली जातात.

मुंबई : तुळशीला हिंदू धर्मात पवित्र आणि पूजनीय मानले जाते. तुळशीशी संबंधित अनेक उपाय (Tulsi Upay) ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रातही तुळशीबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्याच वेळी, वैज्ञानिक दृष्टिकोनातून, तुळशीच्या बिया, पाने आणि मुळे यांच्याशी संबंधित औषधी उपयोगांचे वर्णन केले आहे. तुळशी ही वनस्पती बहुतेक घरांमध्ये आढळते. यासोबतच तुळशीला लक्ष्मीचे रूपही मानले गेले आहे. असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप असते, तिथे देवी लक्ष्मीचा वास नेहमीच असतो. व्यक्तीने तुळशीच्या रोपाशी संबंधित काही नियमांचे पालन केले पाहिजे. अन्यथा नुकसान सोसावे लागू शकते.
विषम संख्येत ठेवा रोप
बहुतेक घरांमध्ये तुळशीचे रोप असते. पण कधी कधी रोपातून गळून पडलेल्या बियांपासून अनेक रोप उगवतात. त्यामुळे एकापेक्षा जास्त तुळशीची रोपे आपोआपच लागली जातात. यामध्ये काही चुकीचे नाही मात्र हे लक्षात ठेवा की घरातील तुळशीचे रोप विषम संख्येप्रमाणेच राहावे, म्हणजे 1, 3, 5, 7. तुळशीची विषम रोपे लावणे शुभ असते.
आंघोळीशीवाय स्पर्श करू नका
तुळशीचे रोप अत्यंत पूजनीय मानले जाते. आंघोळ केल्याशिवाय कधीही स्पर्श करू नका. तसेच जोडे आणि चप्पल घालून स्पर्श करू नका. असे केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते. तुळशीच्या रोपाजवळ नेहमी स्वच्छता ठेवा. जोडे, चप्पल, झाडू, कचराकुंडी इत्यादी ठेवू नका.




थेट जमिनीत लागवड करू नका
तुळशीचे रोप थेट जमिनीत कधीही लावू नका. तुळशीचे रोप वृंदावनातच लावावे. घरामध्ये तुळशीचे रोप लावण्यासाठी सर्वात शुभ दिवस म्हणजे गुरुवार. या दिवशी घरामध्ये तुळशीचे रोप लावल्यास नेहमी सुख-समृद्धी राहते.
वृंदावन योग्य दिशेला ठेवा
घराच्या पूर्व किंवा उत्तर-पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावा. असे केल्याने घरात तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते. तुळशीचे रोप कधीही दक्षिण दिशेला लावू नका. दुसरीकडे रविवारी, एकादशी आणि सूर्यग्रहणाच्या वेळी तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये आणि त्याला पाणी अर्पण करू नये.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)