Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tulsi Vivah 2022: तुलसी विवाहच्या दिवशी करा हे सोपे उपाय, वैवाहिक जीवनातील अडथळे होतील दूर

दिवाळीनंतर तुलसी विवाह करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. वैवाहिक जीवनात अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्यास काही तुलसी विवाहाच्या वेळी केलेल्या काही उपायांमुळे फायदा होऊ शकतो.

Tulsi Vivah 2022: तुलसी विवाहच्या दिवशी करा हे सोपे उपाय, वैवाहिक जीवनातील अडथळे होतील दूर
तुलसी विवाह Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 1:02 PM

मुंबई, कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशीला तुळशी विवाहाचा (Tulsi Vivah 2022) सण साजरा केला जातो. यंदा तुळशीविवाह 5 नोव्हेंबर, शनिवारी आहे. याच्या एक दिवस आधी एकादशीला भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रेनंतर जागे होतात. म्हणजेच देवउठी  एकादशी 4 नोव्हेंबरला असेल. तुळशी विवाहाच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यास वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होऊ शकतात. यासोबतच या उपायांनी पती-पत्नीमधील प्रेमही वाढते. यासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने घरात अपार सुख-समृद्धी राहते.

या वर्षी तुलसी विवाहाला नसेल लग्नाचा मुहूर्त

अनेक वर्षांनंतर असा योग आला आहे की, तुळशीविवाहाच्या दिवशी या वेळी लग्नासाठी मुहूर्त नसेल. शुक्र नक्षत्राच्या अनुपस्थितीमुळे, तुळशी विवाहाच्या दिवशी विवाहासाठी मुहूर्त  नाही कारण लग्नासाठी शुक्र नक्षत्राचा उदय होणे आवश्यक आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला वैवाहिक जीवनात सुखाचा कारक मानले जाते.

सुखी वैवाहिक जीवनासाठी टिप्स

ज्यांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या आहेत त्यांनी तुळशी विवाहाच्या दिवशी काही उपाय करावेत. हे उपाय वैवाहिक जीवन प्रेम आणि आनंदाने भरतील. यासाठी तुळशीविवाहाच्या दिवशी पती-पत्नीने पवित्र नदीत स्नान करावे. जर हे शक्य नसेल तर पवित्र नदीच्या पाण्याने घरी स्नान करा. यानंतर स्वच्छ पाण्यात तुळशीची पाने टाका आणि काही वेळाने हे पाणी संपूर्ण घरात  शिंपडा.

हे सुद्धा वाचा

यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि पती-पत्नीमधील प्रेम वाढते. याशिवाय पती-पत्नीने तुळशीविवाहात एकत्र सहभागी व्हावे. तुळशीमातेला लाल चुनरी आणि सोळा श्रृंगार अर्पण करा. शक्य असल्यास घरात तुळशीविवाह करा. असे केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.