Vaibhav Lakshmi Vrat : 11 शुक्रवारी करा हा प्रभावी उपाय, माता लक्ष्मीच्या कृपेने होईल मोठा धनलाभ
वैभव लक्ष्मी व्रत करणे धन-समृद्धी प्राप्त होण्यासाठी खूप लाभदायक असल्याचे सांगितले आहे. शुक्रवारी वैभव लक्ष्मी व्रत पाळल्यास घरात माता लक्ष्मीचा वास नेहमीच असतो
मुंबई : हिंदू धर्मात, शुक्रवार देवी लक्ष्मीला समर्पित आहे. माता लक्ष्मी संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे. शुक्रवारी पूजा केल्याने लक्ष्मी आणि शुक्राची कृपा प्राप्त होते. धार्मिक शास्त्रांमध्ये लक्ष्मीच्या अनेक रूपांचे वर्णन केले आहे. जसे- महालक्ष्मी, गजलक्ष्मी, वैभव लक्ष्मी (Vaibhav Lakshmi Vrat) इ. यामध्ये वैभव लक्ष्मी व्रत करणे धन-समृद्धी प्राप्त होण्यासाठी खूप लाभदायक असल्याचे सांगितले आहे. शुक्रवारी वैभव लक्ष्मी व्रत पाळल्यास घरात माता लक्ष्मीचा वास नेहमीच असतो. वैभव लक्ष्मी व्रत पूर्ण विधीपूर्वक पाळाणे आवश्यक आहे.
वैभव लक्ष्मी व्रत कधी सुरू करावे?
कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील शुक्रवारी वैभव लक्ष्मी व्रत सुरू करणे शुभ मानले जाते, मात्र अधिकमास किंवा खरमासात हे व्रत सुरू करू नये. वैभव लक्ष्मी व्रत किमान 11 किंवा 21 दिवस करावे.
वैभव लक्ष्मी व्रत उपासना पद्धत
देवी वैभव लक्ष्मीचे व्रत ठेवण्यासाठी शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे. यानंतर स्वच्छ कपडे घाला. देवघर स्वच्छ करून दिवा लावावा आणि देवासमोर हात जोडून व्रत करावे. त्यानंतर संध्याकाळी शुभ मुहूर्तावर वैभव लक्ष्मीची पूजा करा. यासाठी गंगेचे पाणी घालून उत्तर किंवा पूर्व दिशेला काही जागा शुद्ध करा. त्यानंतर लाकडी चौरंगावर गंगाजल शिंपडून ते शुद्ध करावे. चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र टाकावे देवी वैभव लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. सोबत श्रीयंत्राची प्रतिष्ठापना करणे खूप शुभ राहील. यानंतर माता वैभव लक्ष्मीसमोर अक्षत ठेवा आणि त्यावर पाण्याने भरलेला कलश स्थापित करा. त्यानंतर कलशाच्या वर एक वाटी ठेवा आणि त्यात चांदीचे नाणे किंवा दागिने ठेवा. यानंतर पूजा सुरू करा. माता वैभव लक्ष्मीला हळद, कुंकू, लाल फुले, फळे अर्पण करा. वैभव लक्ष्मी मातेला खीर किंवा दुधापासून बनवलेली कोणतीही गोड अर्पण करा. शेवटी वैभव लक्ष्मी व्रत कथा वाचून आरती करावी.
वैभव लक्ष्मी व्रतात या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या
फळे खाल्ल्यानंतर वैभव लक्ष्मी व्रत करावे. काही लोकं हे व्रत एका वेळेचे जेवण करूनही पाळतात. या दिवशी सात्विक गोष्टीच खाव्यात. यासोबतच वैभव लक्ष्मी व्रतात आंबट पदार्थांचे सेवन निषिद्ध आहे.
वैभव लक्ष्मी पूजा मंत्र
या रक्ताम्बुजवासिनी विलासिनी चण्डांशु तेजस्विनी। या रक्ता रुधिराम्बरा हरिसखी या श्री मनोल्हादिनी॥ या रत्नाकरमन्थनात्प्रगटिता विष्णोस्वया गेहिनी। सा मां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीश्च पद्मावती ॥
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)