Vaikuntha Ekadashi 2025 : वैकुंठ एकादशीच्या दिवशी ‘हे’ उपाय करा, घरात नांदेल सुख शांती…
Vaikuntha Ekadashi Upay: हिंदू धर्मात वैकुंठ एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व दिले जाते. वैकुंठ एकादशीच्या दिवशी विष्णू देवाची पूजा केली जाते. या दिवशी विष्णूची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती नांदते. वैकुंठ एकादशीचे व्रत केल्यामुळे तुम्हाला मोक्ष प्राप्ती होते अशी मान्यता आहे. वैकुंठ एकादशीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्यामुळे तुमच्यावर विष्णू देवाची कृपादृष्टी कायम राहाते.
हिंदू धर्मात वैकुंठ एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व दिले जाते. वैकुंठ एकादशीच्या दिवशी विष्णू देवाची पूजा केली जाते. या दिवशी तुम्ही चांगल्या मनानी व्रत आणि विष्णू देवाची उपासना केल्यामुळे तुमच्यावर त्यांचे आशिर्वाद कायम राहाते. मान्यतेनुसार, वैकुंठ एकादशीचे व्रत केल्यामुळे तुमच्यावर विष्णू देवाची कृपादृष्टी कायम राहाते आणि मृत्यूनंतर तुम्हाला मोक्ष देखील मिळतो. वैकुंठ एकादशीचे व्रत केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व पाप नष्ट होण्यास मदत आणि तुमचं मन शांत राहातं. वैकुंठ एकादशीच्या दिवशी विष्णू देवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामधील अडथळे कमी होते आणि तुम्हाला विशेष आशिर्वादाची प्राप्ती होते.
पंचांगानुसार, यंदाचा वैकुंठ एकादशीच्या व्रताला 9 जानेवारी रोजी दुपारी 12.22 पासून सुरुवात होईल ते 10 जानेवारी सकाळी 10.19 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार वैकुंठ एकादशीचे व्रत आणि पूजा 10 जानेवारी रोजी केली जाणार आहे. वैकुंठ एकादशीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी विष्णू देवाची पूजा केल्याने मोक्ष प्राप्ती होतो. हा दिवस तुमच्या आयुष्यातील पापांचा नाश करून मन शुद्ध करण्याची उत्तम संधी आहे. या दिवशी व्रत केल्यास विष्णू देवाची कृपा होऊन जीवनात सुख-समृद्धी येते. वैकुंठ एकादशीचे व्रत करून लोक स्वर्गप्राप्तीचा मार्ग सुखाचा करू शकतात ज्यामुळे मृत्यूनंतर वैकुंठधाम प्राप्त होऊ शकते.
वैकुंठ एकादशीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय
वैकुंठ एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर संपूर्ण घर स्वच्छ झाडून आणि स्वच्छ लादी पून घ्यावी. त्यानंतर पूजेचे ठिकाण स्वच्छ करून फुलांनी आणि दिव्यांनी सजवावे. पूजा घरामध्ये विष्णू देवाची मूर्ती किंवा चित्र स्थापन करा. त्यानंतर विष्णूंना गंगाजलाने स्नान घाला आणि त्यांना फुले, चंदन, रोळी, सिंदूर इत्यादी अर्पण करा. त्यानंतर विष्णूच्या विविध मंत्रांचा जप करा आणि त्यावेळी विष्णू देवाला फळे, मिठाई किंवा इतर नैवेद्य अर्पण करा.
वैकुंठ एकादशीच्या दिवशी काय करावे?
- वैकुंठ एकादशीच्या दिवशी दिवसभर निर्जल उपवास करा किंवा या दिवशी तुम्ही फळांचे सेवन करू शकता
- वैकुंठ एकादशीच्या दिवशी गरिबांना दान केल्यामुळे तुम्हाला पुण्य मिळते
- विष्णूची पूजा करताना “ओम नमो नारायणाय”, “ओम विष्णुवे नमः” या मंत्राचा जप करावा.
वैकुंठ एकादशीच्या दिवश या गोष्टी टाळा :
- वैकुंठ एकादशीच्या दिवशी नकारात्मक विचारांपासून दूर राहा.
- वैकुंठ एकादशीचे व्रत करताना खोटे बोलणे टाळा.
- वैकुंठ एकादशीच्या दिवशी मांसाहाराचे सेवन टाळा.
- वैकुंठ एकादशीला कांदा आणि लसूण खाऊ नये.