Vaishakh Amavashya 2023 : विवाहीत स्त्रियांसाठी वैषाख अमावस्या का मानली जाते विशेष? या दिवशी अवश्य करा हे काम

शाख अमावस्येच्या दिवशी स्नान, दान, व्रत, वटवृक्षाची पूजा केल्याने खूप फायदा होतो. यावर्षी वैशाख अमावस्या 19 मे रोजी येत आहे. जाब, दिल्ली, ओडिशा, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये वट सावित्री व्रत या 19 मे  म्हणजेच अमावस्येला पाळले जाईल.

Vaishakh Amavashya 2023 : विवाहीत स्त्रियांसाठी वैषाख अमावस्या का मानली जाते विशेष? या दिवशी अवश्य करा हे काम
अमावस्याImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 07, 2023 | 1:05 PM

मुंबई : हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे. यापैकी काही अमावस्या विशेष मानल्या गेल्या आहेत. वैशाख महिन्याची अमावस्या (Vaishakh Amavashya 2023) खूप खास असते कारण या दिवशी एक नव्हे तर तीन खास प्रसंग येतात. शनि जयंतीही वैशाख अमावस्येला येते आणि या दिवशी विवाहित महिला वट सावित्री व्रत पाळतात. वैशाख अमावस्येच्या दिवशी स्नान, दान, व्रत, वटवृक्षाची पूजा केल्याने खूप फायदा होतो. यावर्षी वैशाख अमावस्या 19 मे रोजी येत आहे. जाब, दिल्ली, ओडिशा, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये वट सावित्री व्रत या 19 मे  म्हणजेच अमावस्येला पाळले जाते. या दिवशी शनी जयंतीही साजरी केली जाणार आहे. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो, याशिवाय शनिदेव, भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांचाही आशीर्वाद असतो.

ज्येष्ठ अमावस्या 2023 कधी आहे

ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने सात जन्मांची पापे धुतले जातात. याशिवाय या दिवशी अवश्य करावे, यामुळे पितर प्रसन्न होतात. हिंदू कॅलेंडरनुसार, ज्येष्ठ अमावस्या तिथी 18 मे 2023 रोजी रात्री 9.42 वाजता सुरू होईल आणि 19 मे 2023 रोजी रात्री 9.22 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार 19 मे, शुक्रवार हा ज्येष्ठ अमावस्या मानला जाईल.

हे सुद्धा वाचा
  • ज्येष्ठ अमावस्येला स्नानाची वेळ – सकाळी 05.15 ते दुपारी 04.59
  • वट सावित्री पूजा मुहूर्त – सकाळी 05.43 ते 08.58 पर्यंत
  • शनि जयंतीला शनिदेव पूजा मुहूर्त – संध्याकाळी 06.42 ते 07.03 पर्यंत

ज्येष्ठ अमावस्येला हे काम अवश्य करावे

  • वैशाख अमावस्येच्या दिवशी पवित्र नदी, जलाशय किंवा तलावात स्नान करावे. तसेच सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे.
  • अमावास्येच्या दिवशी वाहत्या पाण्यात काळे तीळ वाहण्याने अनेक त्रासांपासून मुक्ती मिळते.
  • पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान करणे आणि गरिबांना दान करणे यासाठीही अमावस्येचा दिवस महत्त्वाचा आहे. या दिवशी स्नान केल्यानंतर दान करावे.
  • वैशाख अमावस्येच्या दिवशी विवाहित महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी यमदेवतेची पूजा करावी.
  • शनिदेवाचा जन्म वैशाख अमावस्येच्या दिवशी झाला. शनि जयंतीला शनिदेवाला मोहरीचे तेल, काळे तीळ, काळे वस्त्र आणि निळे फुले अर्पण करा. शनि चालिसाचा जप करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.