मुंबई : उद्या 8 मे रोजी शनि त्रयोदशी आहे (Shani Trayodashi). ज्यावेळी त्रयोदशी तिथी शनिवारी पडते, त्याला शनि प्रदोष असेही म्हणतात. कारण, प्रदोष व्रत महिन्याच्या दोन्ही पक्षातील त्रयोदशीला ठेवला जातो. प्रदोषची दिवस भगवान शिव यांना समर्पित असतो (Vaishakh Month 2021 Do These Upay On Shani Trayodashi To Get Rid Of Poverty And Infertility).
या दिवशी बरेच लोक त्यांच्या इच्छापूर्तीसाठी उपवास ठेवतात. जर आपण उपवास ठेवू शकत नसेल तर शनि त्रयोदशीच्या दिवशी भोलेनाथ यांच्यासह शनिदेवाची पूजा करावी. यामुळे तुमच्या आयुष्यातील शनिशी संबंधित सर्व त्रास दूर होतील. याशिवाय शनि त्रयोदशीच्या दिवशी तुम्ही काही उपाय करुन आयुष्यातील समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता.
जर तुम्हाला मुल नसेल तर शनि त्रयोदशीच्या दिवशी शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर 11 फुले आणि 11 बेलपत्रांची माळ अर्पण करा. जर आपल्या मुलाला कुठल्या गंभीर आजाराने ग्रासले असेल तर, शनि त्रयोदशीला एक दगड घ्या आणि त्याला काळ्या रंगाने रंगवा आणि त्याला पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ठेवा. यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि शनि मंत्राचा 108 वेळा जप करा.
आज रात्री एका भांड्यात मोहरीचे तेल भरुन आणि ते आपल्या पलंगाखाली ठेवा. सकाळी त्या तेलात पकोडे बनवून कुत्र्यांना खायला घाला. त्याशिवाय, मोहरीच्या तेलाचा पराठा किंवा तेलाची चपाती काळ्या गायीला किंवा काळ्या कुत्र्याला द्या. मान्यता आहे की यामुळे घरातील दारिद्र्य दूर होते आणि उत्पन्नाची नवीन साधनं मिळतात.
जर तुमच्या आयुष्यातील समस्या संपण्याचे नाव घेत नसेल, तर शनि त्रयोदशीच्या दिवशी एका भांड्यात मोहरीचे तेल काढा आणि त्या तेलात आपला चेहरा बघा. नंतर एखाद्याला ते तेल दान करा. असे केल्याने जीवनातील सर्व त्रास दूर होतात.
जर एखाद्याने आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवले असेल, तर त्रयोदशीच्या दिवशी पिंपळाच्या पानांवर चमेलीचे तेल लावा आणि मंदिरातील शिवलिंगावर अर्पण करा. यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा आणि शनि मंत्र ओम शं ह्रीं शं शनैश्चराय नमः याचा 108 वेळा जप करा. यामुळे तुमचे त्रासही दूर होतील आणि शनि संबंधित कष्टही कमी होतील.
आपल्या वैवाहिक जीवनात काही समस्या असल्यास शनि त्रयोदशीच्या दिवशी तुम्ही काळ्या गायीच्या कपाळावर कुंकवाने टिळा करा. यानंतर त्या गायीला बुंदीचा लाडू खायला घाला. मग गायीच्या उजव्या शिंगाला त्याच्या हाताने स्पर्श करा आणि आशीर्वाद घ्या. यामुळे आपल्या वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणींचा अंत होईल.
उत्पन्नाचे स्त्रोत वाढवायचे असेल तर मासिक शिवरात्रीला ‘हे’ उपाय नक्की करा, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्वhttps://t.co/afBYFBfTZJ#MasikShivratri
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 6, 2021
Vaishakh Month 2021 Do These Upay On Shani Trayodashi To Get Rid Of Poverty And Infertility
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Varuthini Ekadashi 2021 : 7 मे रोजी वरुथिनी एकादशी, या दिवशी ‘ही’ कामं चुकूनही करु नये
May Month Ekadashi 2021 | एकादशीला भात का खाऊ नये? जाणून घ्या धार्मिक महत्व
Lord Vishnu | भगवान शंकराने विष्णूंच्या पुत्रांचा वध केला होता, जाणून घ्या ही पौराणिक कथा