Vaishakh Purnima 2023 : वैशाख पौर्णिमेला केलेल्या या उपायांनी होते आर्थिक चणचण दूर
नप्राप्तीसाठी आणि श्रीमंत होण्यासाठी आजची पौर्णिमा रात्र खूप खास आहे. आज रात्री लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी केलेले उपाय जलद फळ देतील.
मुंबई : आज 5 मे, शुक्रवारी वैशाख पौर्णिमा (Vaishakh Purnima 2023) आहे. यासोबतच आज चंद्रग्रहणही (Chandra Grahan 2023) होत आहे. पौर्णिमेचा दिवस आणि शुक्रवार संपत्तीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या संदर्भात, धनप्राप्तीसाठी आणि श्रीमंत होण्यासाठी आजची पौर्णिमा रात्र खूप खास आहे. आज रात्री लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी केलेले उपाय जलद फळ देतील. घरात सुख-समृद्धी वाढेल. वैशाख पौर्णिमेला देवी लक्ष्मीची पूजा करून धनसंपत्ती मिळवण्याचे मार्ग जाणून घेऊया.
पौर्णिमेचे उपाय
जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल, आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर वैशाख पौर्णिमेच्या रात्री करा हे सोपे उपाय. यामुळे तुमच्या घरात पैशाचा ओघ वाढेल.
हे सुद्धा वाचा
- आज वैशाख पौर्णिमेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक करा. माता लक्ष्मीला पूजेत 11 पिवळ्या कवड्या अर्पण करा. पिवळ्या कवड्या नसल्यास पांढऱ्या भागात हळद टाकून त्याचा वापर करता येईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या कवड्या लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवा. यासोबतच माता लक्ष्मीची रोज प्रार्थना करा, तुमच्या जीवनात संपत्ती आणि आनंद वाढू लागेल.
- पौर्णिमेच्या दिवशी पांढरा रंग वापरणे शुभ मानले जाते. आज पांढरे कपडे घाला. माता लक्ष्मीची पूजा नियमानुसार करा. पूजेत देवी लक्ष्मीला लोणी आणि केशर मिश्रित खीर अर्पण करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्नान करून या खिरीचा प्रसाद घ्यावा. माता लक्ष्मी प्रसन्न होऊन संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद देईल.
- तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या मूर्ती किंवा चित्राजवळ गोमती चक्र स्थापित करा. कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे गोमती चक्र संपत्तीच्या ठिकाणी ठेवावे. यामुळे तुम्हाला व्यवसायात झपाट्याने प्रगती होईल. तुमच्या व्यवसायात खूप भरभराट होईल.
- वैशाख पौर्णिमेला सकाळी स्नान केल्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडी हळद टाकून हे पाणी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शिंपडावे. तसेच मंदिरात नवीन झाडू दान करा. माता लक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)