किचन ओट्यावर चपाती, भाकरी लाटण्यामुळे काय परिणाम होतात? सुख-समृद्धी कि दारिद्र्य?

चपाती किंवा भाकरीशिवाय जेवण अपूर्ण मानलं जातं. आज काल अनेक महिला पोलपाट-लाटण्याचा वापर न करता थेट किचन स्लॅबवर किंवा ओट्यावर चपाती लाटतात. पण ही पद्धत योग्य आहे की नाही याबद्दल शास्त्रात काही नियम सांगितले आहेत.

किचन ओट्यावर चपाती, भाकरी लाटण्यामुळे काय परिणाम होतात?  सुख-समृद्धी कि दारिद्र्य?
Follow us
| Updated on: Jan 11, 2025 | 7:59 PM

आपण स्वयंपाक करताना चपाती किंवा भाकरी रोज करतो. पण काही स्त्रिया या पोलपाट लाटणं न घेता तसेच किचन ओट्यावर चपात्या लाटतात किंवा भाकरी थापतात. पण तुम्हाला माहितीये कि वास्तूशास्त्रानुसार या गोष्टीचाही आपल्या घरावर परिणाम होत असतो.

शास्त्रानुसार चपाती किंवा भाकरी कशी लाटावी?

वास्तूशास्त्रात स्वयंपाक घराबद्दलही काही नियम सांगितलेले आहेत जे कदाचित सर्वांना माहित नसतील. तसेच शास्त्रानुसार चपाती किंवा भाकरी करण्यासंबंधातही काही नियम सांगितले आहेत.

जसं की आपण लहानपणीसुद्ध ऐकलं असेल की आपली आई, आजी पहिली चपाती किंवा पहिला नैव्यद्य हा गायीसाठी तसेच देवासाठी बाजूला काढायची. आजही काही ठिकाणी ही परंपरा पाळली जाते. पण स्वयंपाक बनवण्याच्या पद्धती जर चुकीच्या असतील तर मात्र याचा काहीही फायदा होणार नाही.

किचन स्लॅबवर किंवा ओट्यावर चपाती लाटणे अशूभ?

काही स्त्रियांना या किचन स्लॅबवर किंवा ओट्यावर चपाती बनवणे सोपे वाटते. म्हणून ते विना पोलपाट चपाती बनवतात. पण वास्तूशास्त्रानुसार हे अशुभ मानलं जातं. होय, वास्तूशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात वापरली जाणारी लाटणं सुख-समृद्धीचा कारक मानली जाते. पोलपाट-बेलनं राहु-केतूशी संबंधित असतं असं म्हटलं जातं. या कारणामुळे या दोन ग्रहांचा प्रभाव घरामध्ये अतिशय महत्त्वाचा असतो.

यामुळेच पोलपाट-लाटणं चपाती लाटताना खूप महत्वाचा मानला जातो. असे मानले जाते की चपाती बनवताना या दोन्हींचा वापर केल्यास घरात समृद्धी नांदते. पण जर तुम्ही पोलपाट-लाटणं न वापरता स्लॅबवर किंवा ओट्यावर चपाती लाटल्यास घरातील सुख, शांती आणि समृद्धीवर परिणाम होतो असं म्हटलं जातं.

पोलपाट-लाटण्याचा वापर करून चपाती लाटणे म्हणजे समृद्धी?

काही समजुतींनुसार, स्वयंपाकघरात पोलपाट-लाटणं वापरून चपाती लाटल्यास घरात समृद्धी येते आणि राहू-केतू सारख्या ग्रहांच्या प्रभावापासून संरक्षण होते. त्यांचा योग्य वापर केल्यास घरातील वातावरण संतुलित राहण्यास मदत मिळते. असंही म्हणतात.

वास्तुशास्त्र आणि चपाती लाटण्याची परंपरा

वास्तुशास्त्रात चपाती लाटण्यासाठी पोलपाट-लाटणं विशेष महत्त्व असतं. घराच्या सुख-समृद्धीसाठी हे शुभ मानले जाते. चपाती लाटताना पोलपाट-लाटण्याचा वापर केला नाही तर घरामध्ये गरिबी आणि पैशाची कमतरता निर्माण होते असंही सांगितलं आहे.

याशिवाय अन्न आणि समृद्धीची देवी मानल्या जाणाऱ्या माता अन्नपूर्णाची कृपाही कमी होऊ शकते. तसेच हे घरातील अशुभ ग्रहांचा प्रभाव म्हणून पाहिले जाते. त्यामुळे शास्त्रानुसार तरी पोलपाट-बेलण्याचा वापर करून पोळ्या, चपात्या, भाकरी लाटणे उत्तम मानले गेले आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.