Vastu Tips: घरात नेहमी भांडणे होत असतील तर काय करावे प्रश्न पडलाय का? जाणून घ्या सोप्या वास्तु टिप्स….
Vatstu Dosh: वास्तु दोषांमुळे घर नेहमीच आर्थिक समस्यांनी घेरलेले असते. घरात दररोज भांडणे होतात किंवा कुटुंबातील कोणीतरी आजाराने ग्रस्त आहे. काही वास्तु उपाय तुम्हाला या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करू शकतात. घरात भांडणे आणि वाद होत नाहीत अशा उपायांबद्दल जाणून घेऊया.

हिंदू धर्मामध्ये वास्तूशास्त्राला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये वास्तू एक महत्त्वाची भूमिका बजावते. तुमच्या घराची किंवा घरातील वस्तूंची वास्तू तुमच्या जीवनावर चांगले किंवा वाईट परिणाम करू शकतात. वास्तुशास्त्रामघ्ये असे म्हटले जाते की, प्रत्येक वस्तूची आणि प्रत्येक दिशीची स्वत:ची एक विशेष उर्जा असते. तुमच्या जीवनातील सर्व प्रसंग तुमच्या शरीरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील उर्जेवर अवलंबून असतं. वास्तुशास्रामध्ये काही विशेष नियम सांगितले आहेत. वास्तूच्या नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या जीवनावर त्याचा परिणाम दिसून येतो.
वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन नाही केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मक परिणाम होतात. या नियमांचे पालन नाही केल्यामुळे तुमच्या घरामध्ये वास्तूदोष निर्माण होऊ शकतो. वास्तूदोषामुळे तुमच्या घरातील वातावरण नकारात्मक होते. वास्तूदोषामुळे तुमच्या घरातील शांती आणि आनंद संपून जातो आणि घरातील सदस्यांमध्ये मतभेद होतात. घरातील सदस्य सतत भांडतात. वास्तु दोषांमुळे घर नेहमीच आर्थिक समस्यांनी वेढलेले असते.
वास्तूदोषामुळे घरात दररोज भांडणे होतात किंवा कुटुंबातील कोणीतरी आजाराने ग्रस्त आहे. काही वास्तु उपाय तुम्हाला या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करू शकतात. घरात भांडणे आणि वाद होत नाहीत अशा उपायांबद्दल जाणून घेऊया. वास्तुदोषांच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी, सर्वप्रथम घरातील वास्तु योग्य ठेवावी. वास्तु योग्य ठेवण्यासाठी, दररोज सकाळी घराच्या मंदिरात धूप जाळला पाहिजे. यामुळे घरात सकारात्मकता राहते. घर नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे. असे म्हटले जाते की देवी लक्ष्मीला स्वच्छ नसलेल्या घरात राहणे आवडत नाही. घर स्वच्छ ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते. नकारात्मक ऊर्जा दूर ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. घरात तुळशीची लागवड करणे देखील वास्तुदोषासाठी फायदेशीर आहे. मान्यतेनुसार, तुळशी लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात. आई तुळशी नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. आई तुळशी घर सकारात्मक उर्जेने भरते. हे लागू केल्याने घरातील कलहही संपतात.
जर तुमच्या घरात वारंवार भांडणे होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी पितळेच्या भांड्यात कापूर जाळून तो घरभर दाखवणे फायदेशीर ठरू शकते. या उपायाचा अवलंब केल्याने घरात सुख-शांती येते. पिंपळाचे झाड घराचा स्वामी मानले जाते. घरातील भांडणे आणि वादविवाद संपवण्यासाठी पिंपळाच्या झाडाची सेवा करावी. हे रोप घराजवळ लावावे आणि त्याची काळजी घ्यावी. असे केल्याने देवता कुटुंबातील सदस्यांवर त्यांचे आशीर्वाद ठेवतात. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचे पाणी शिंपडावे. नंतर दाराच्या दोन्ही बाजूंना पाणी ओतले पाहिजे. यामुळे घरात नकारात्मक उर्जेचा प्रभाव कमी होतो. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी हळदीचे पाणी उपयुक्त ठरते.