Vastu Tips : घरात मनी प्लांट ठेवताना चुकूनही ही चूक करू नका, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान, वास्तु शास्त्र काय सांगतं?
अनेकजण आपल्या घरात, ऑफिसमध्ये आपल्या ऑफिसच्या टेबलावर मनी प्लांटचं रोप ठेवतात, मात्र ते ठेवताना योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे असं वास्तू शास्त्र सांगतं.
वास्तु शास्त्राची व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका असते. अनेक जण वास्तु शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपल्या घराची रचना करतात. मात्र अनेकदा घरातील वस्तू या वास्तु शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ठेवल्या जात नाहीत, त्यामध्ये काही चुका होता. याचा परिणाम हा त्या व्यक्तीवर आणि पर्यायानं त्याच्या कुटुंबावर होतो. त्यामुळे घरातील वस्तू या देखील वास्तु शास्त्रात सांगितलेल्या नियमांप्रमाणेच ठेवणं गरजेचं असतं. यामध्ये तुमच्या घरात ठेवलेल्या विविध प्रकारच्या वनस्पतींचा देखील समावेश होतो. अशा अनेक वनस्पती आहेत, ज्यांना घरात ठेवणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. वास्तू शास्त्रात देखील या झाडांना शुभ मानलं गेलं आहे. यामध्ये मनी प्लांटचा देखील समावेश होतो.
अनेकजण आपल्या घरात, ऑफिसमध्ये आपल्या ऑफिसच्या टेबलावर मनी प्लांटचं रोप लावतात. मात्र तुम्ही मनी प्लांट वास्तु शास्त्रानुसार न ठेवता जर चुकीच्या दिशेला ठेवलं तर त्याचे अनेक वाईट परिणाम तुम्हाला दिसू शकतात. तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वास्तू शास्त्रानुसार मनी प्लांट हा चुकूनही घराच्या, ऑफिसच्या उत्तर -पूर्व दिशेला नसावा जर तो उत्तर पूर्व दिशेला असेल तर तुम्हाला पैशांशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या घरात मनी प्लांट उत्तर -पूर्व दिशेला ठेवला असेल तर तो तिथून हलवून घराच्या दक्षिण -पूर्व दिशेला ठेवावा.
या गोष्टी लक्षात घ्या
मनी प्लांटला नेहमी घराच्या आत लावणंच शुभ मानलं जातं. जर तुम्ही तुमच्या घरात काचेच्या बाटलीत मनी प्लांट लावला असेल तर त्याचं पाणी ठरावीक दिवसातून एकदा बदला.सोबत तुमचा मनी प्लांट सुखणार नाही याकडे देखील लक्ष द्या.जर तुमचा मनी प्लांट सुखला असेल तर ते धन हानीचे संकेत असतात. तुम्हाला मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं.तसेच तुम्ही तुमच्या घरात लावलेला मनी प्लांटच्या वेलाची पानं जमिनीला स्पर्श करणार नाहीत याची देखील काळजी घ्या कारण वास्तू शास्त्रात ते देखील अशुभ मानलं गेलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)