Vastu Tips : घरात या ठिकाणी लावू नये पितरांचे फोटो, करावा लागतो वास्तूदोषाचा सामना

Vastu Tips असे मानले जाते की पितरांचे फोटो लावल्याने घरातील लोकांवर पितरांची  कृपा राहते. तसेच पितरांची फोटो घरात सुख-समृद्धीचे कारण बनतात. घरामध्ये पूर्वजांची फोटो ठेवणे चांगले आहे, परंतु त्यांची चित्रे ठेवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

Vastu Tips : घरात या ठिकाणी लावू नये पितरांचे फोटो, करावा लागतो वास्तूदोषाचा सामना
पितृपक्षImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 03, 2023 | 10:51 AM

मुंबई : सध्या पितृपक्ष सुरू आहे. या दिवसांत घरातील स्वर्गवासी पुर्वजांचे स्मरण केले जाते. घरांमध्ये पूर्वजांची म्हणजेच मृत पावलेल्या सदस्यांचे फोटो लावले जातात. पूर्वज हे जग सोडून गेल्यावरही त्यांच्या आठवणी कायम हृदयात राहतात तसेच त्यांते स्मरण राहावे अशी यामगची भावना आहे. असे मानले जाते की पितरांचे फोटो लावल्याने घरातील लोकांवर पितरांची  कृपा राहते. तसेच पितरांची फोटो घरात सुख-समृद्धीचे कारण बनतात. घरामध्ये पूर्वजांची फोटो ठेवणे चांगले आहे, परंतु त्यांची चित्रे ठेवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. चला तर मग जाणून घेऊया वास्तूशास्त्रानुसार (Vastu Tips) घरात पितरांचे फोटो लावताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

घरतील देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नका

काही लोक त्यांच्या देवघरात त्यांच्या पूर्वजांची फोटो लावून त्यांची पूजा करतात. शास्त्रानुसार पितरांचे स्थान जरी उच्च आणि आदरणीय मानले जात असले तरी पितरांचे आणि देवांचे स्थान वेगळे असते. अशा स्थितीत पूजेच्या ठिकाणी पूर्वजांची फोटो लावल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे देवताही नाराज होतात.

आपल्या पूर्वजांचे फोटो टांगून ठेवू नका

घरामध्ये पूर्वजांचे फोटो कधीही टांगवून ठेवू नयेत. पूर्वजांचे फोटो लाकडी स्टँडवर ठेवावे. याशिवाय काही लोकं अशा ठिकाणी पूर्वजांचे फोटो लावतात, जिथे सर्वांची नजर त्यांच्यावर पडते, पण असे करू नये. तेथून जाताना मृत व्यक्तींचे फोटो पाहून मनात निराशा निर्माण होते.

हे सुद्धा वाचा

या ठिकाणीही लावू नका पूर्वजांचे फोटो

बेडरूममध्ये, घराच्या मध्यवर्ती ठिकाणी किंवा स्वयंपाकघरात पूर्वजांची फोटो लावू नयेत. यामुळे पितरांचा राग येतो, ज्यामुळे घरातील सुख-शांतीवर वाईट परिणाम होतो आणि घरात कलह निर्माण होतो.

जिवंत माणसांच्या फोटोंसोबत पूर्वजांचे फोटो लावू नका

जिवंत लोकांच्या फोटोंसोबत पूर्वजांची फोटो कधीही लावू नयेत. असे केल्याने जिवंत माणसांचे आयुर्मान कमी होऊ लागते. त्याचाही त्या व्यक्तीवर नकारात्मक परिणाम होऊ लागतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.