Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : भोजन करतांना अवश्य करा या नियमांचे पालन, वास्तूशास्त्रात दिली आहे माहिती

बऱ्याचदा काही घरांमध्ये तुम्हाला सतत भांडणं असल्याचं जाणवतं. काही घरांमध्ये सुखशांती आणि समाधानाचा अंशही नसतो. अशावेळी आपल्याला काही वास्तूदोष असल्याचंही सांगण्यात येतं.

Vastu Tips : भोजन करतांना अवश्य करा या नियमांचे पालन, वास्तूशास्त्रात दिली आहे माहिती
वास्तूशास्त्रImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 1:15 PM

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार (Vastu Tips) दिशा आणि घरात ठेवलेल्या वस्तूंचे आपल्या जीवनात खूप महत्त्व असते. यासोबतच आपण आपल्या दैनंदिन जीवनात जे काही करतो तसेच ज्या आपल्या सवयी असतात त्याचाही आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. हा प्रभाव सकातात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचा असतो. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या आपण जेवताना लक्षात ठेवल्या पाहिजेत. होय, वास्तुशास्त्रानुसार आपल्या आहारासोबतच मनाची शुद्धता आणि घरातील वातावरण प्रसन्न असणे आवश्यक आहे.

जेवताना या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी

  1. अंथरुणावर बसून कधीही जेवू नये. वास्तुशास्त्रानुसार हे चुकीचे आहे. असे केल्याने नकारात्मकता वाढते.
  2. वास्तूनुसार जेवणाचे ताट कधीही थेट जमिनीवर ठेवू नये, तसेच थेट जमिनीवर बसून जेवू नये. नेहमी आसनावर किंवा पाटावर बसूनच जेवावे. ताट पाटावर ठेवून जेवावे. हे शक्य नसल्यास ताटाखाली पाण्याचे मंडल करावे.
  3. वाढलेले ताट दुसऱ्याला देतांना ते दोन्ही हाताने पकडावे. यामुळे इतरांसोबतचे नाते घट्ट होते. परस्परांबद्दल प्रेम वाढते.
  4. वास्तूशास्त्रानुसार जेवताना मुख पूर्व किंवा उत्तर-पूर्व दिशेला ठेवावे. दक्षिणेकडे तोंड करून अन्न खाणे अशुभ मानले जाते. यामुळे व्यक्तीला पचनासह अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
  5. वास्तुनूसार, तुटलेल्या किंवा घाणेरड्या भांड्यांमध्ये जेवू नये, यामुळे घरात दारिद्र्य वाढते. यासोबतच जीवनात अडचणींचा सामना करावा लागतो.
  6. जेवताना भांडण आणि वाद-विवाद करू नये. यामुळे अन्नदोष लागतो. जेवलेले अन्न अंगी लागत नाही. तसेच यामुळे अन्नपूर्णा देवी रूष्ठ होते. वास्तूदोष निर्माण झाल्याने अनेक समस्या निर्माण होतात.
  7. आंघोळ न करता कधीही जेवण करू नये. यामुळे नकारात्मकता वाढते.  आळस वाढतो आणि आजारांना आमंत्रण मिळते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

हे सुद्धा वाचा
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.