Health Vastu Tips | मासिक पाळी दरम्यान असह्य वेदना होतात? आरोग्याच्या अनेक समस्या आहेत, वास्तु टिप्स फॉलो करा
आपल्या आयुष्यात (Life)अनेक गोष्टी अशा असतात ज्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. वास्तुशास्त्रानुसार (Vastu) घरातील काही वास्तु दोषांचा महिलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
मुंबई : आपल्या आयुष्यात (Life)अनेक गोष्टी अशा असतात ज्याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. वास्तुशास्त्रानुसार (Vastu) घरातील काही वास्तु दोषांचा महिलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत महिला चांगल्या आरोग्यासाठी कोणत्या वास्तु टिप्स वापरु शकता. घरातील आधारस्तंभ म्हणजे घरातील स्त्री. महिला हा प्रत्येक कुटुंबाचा महत्त्वाचा घटक आहे. रोजच्या कामाच्या गडबडीमध्ये महिला (Women) त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. कधीकधी सर्व करुनही घरातील महिला नेहमी आजारी असते. छोट्या मोठ्या आजारांनी तिला वेढलेलं असतं यासाठी वास्तु दोष देखील कारणीभूत असू शकतो. अशा परिस्थितीत या वास्तुदोष सुधारण्यासाठी या वास्तु टिप्स काम करतील . चला जाणून घेऊया महिलांनी निरोगी आयुष्यासाठी कोणत्या वास्तु टिप्स पाळल्या पाहिजेत.
मुख्य प्रवेशद्वार वास्तुशास्त्रात घराचे मुख्य प्रवेशद्वार खूप महत्त्वाची भूमिका बजावते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी प्रवेशद्वारासह सर्व दरवाजे आतून उघडले पाहिजेत. मुख्य प्रवेशद्वार आग्नेय दिशेला असल्यास घरात राहणाऱ्या महिलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रवेशद्वार विरुद्ध दिशेला ठेवू नका.
पूजास्थान प्रत्येक घरात पूजास्थानाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे घर खरेदी करताना हे ध्यानात ठेवावे की पूजास्थान योग्य दिशेने असावे. वास्तुशास्त्रानुसार पूजेचे स्थान उत्तर-पूर्व दिशेला असावे.
गर्भवती महिलांनी या दिशेला कधीही झोपू नये वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक स्त्रीने ती ज्या स्थितीत झोपत आहे त्या स्थितीची काळजी घेतली पाहिजे. उत्तम आरोग्यासाठी गर्भवती महिलांनी कधीही उत्तरेकडे डोके ठेवून झोपू नये. चुकीच्या दिशेने झोपल्याने आई आणि तिच्या न जन्मलेल्या मुलाच्या आरोग्यावर परिणाम होतो.
पिण्याचे पाणी तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की चुकीच्या दिशेने पाणी प्यायल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. वास्तुशास्त्रानुसार पाणी पिताना तुमचे तोंड ईशान्य किंवा पूर्व दिशेकडे असावे. दक्षिण-पश्चिम दिशेला पाण्याची टाकी किंवा पाण्याने भरलेली वस्तू कधीही ठेवू नये. याचा महिलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. घरातील रंगाकडे विषेश लक्ष देण्याची गरज असते. घरातील स्वयंपाक घरात कपाटांचा रंग कधीही लाल नसावा.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
संबंधीत बातम्या :
Chanakya Niti : ‘बचके रहना रे बाबा’ या 5 लोकांशी शत्रुत्व म्हणजे स्व:ताचे नुकसान
09 March 2022 Panchang | 09 मार्च 2022, बुधवारचे पंचांग, शुभ मुहूर्त आणि राहुकाळ
Vastu tips | काय सांगताय प्रेग्नन्सी संबंधित असतात वास्तूनियम !, समजून घेऊन, योग्य ती काळजी घ्या