Vastu Tips for money: खिश्यात टिकत नसेल पैसा तर घराच्या मुख्य दरवाज्याशी संबंधित असू शकतो वास्तू दोष!

आपले जीवन आनंदी व्हावे आणि कोणत्याही गोष्टीची कमतरता राहू नये, अशी प्रत्येकाची इच्छा असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकं अहोरात्र कष्ट करून पैसेही कमावतात, कित्येकांना आपल्या परिवारापासून दूरही राहावे लागते.  परंतु अनेकदा आपल्याला  मेहनतीचे फळ मिळत नाही, त्यामुळे आपण अस्वस्थ होतो. याशिवाय काही वेळा विनाकारण पैसेही खर्च होतात (money does not stay in the pocket). […]

Vastu Tips for money: खिश्यात टिकत नसेल पैसा तर घराच्या मुख्य दरवाज्याशी संबंधित असू शकतो वास्तू दोष!
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 2:35 PM

आपले जीवन आनंदी व्हावे आणि कोणत्याही गोष्टीची कमतरता राहू नये, अशी प्रत्येकाची इच्छा असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकं अहोरात्र कष्ट करून पैसेही कमावतात, कित्येकांना आपल्या परिवारापासून दूरही राहावे लागते.  परंतु अनेकदा आपल्याला  मेहनतीचे फळ मिळत नाही, त्यामुळे आपण अस्वस्थ होतो. याशिवाय काही वेळा विनाकारण पैसेही खर्च होतात (money does not stay in the pocket). वास्तुशास्त्रात (Vastushastra) सांगण्यात आले आहे की, घरामध्ये वास्तुदोष (vastu dosh) असल्यास कुटुंबाच्या प्रगतीत अडथळे येतात आणि पैसा टिकत नाही. वास्तुशास्त्रानुसार, मुख्य दरवाजावर काही गोष्टींच्या उपस्थितीने सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते   (main door of the house). या वस्तू मुख्य दारात ठेवल्यास नकारात्मकता दूर होते आणि कुटुंबात सुख-समृद्धी येते. चला तर मग जाणून घेऊया वास्तुचे सोपे उपाय, ज्याद्वारे तुमचे घर धन-संपत्तीने संपन्न राहील आणि तुमच्या खिशातला पैसाही टिकेल.

या वस्तू मुख्य दरवाजासमोर ठेवू नये

स्वच्छ घर, विशेषत: मुख्य प्रवेशद्वार सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. मुख्य प्रवेशद्वाराजवळ कचरापेटी, तुटलेल्या खुर्च्या किंवा स्टूल ठेवू नका. मुख्य दरवाजा नेहमी थ्रेशोल्ड (संगमरवरी किंवा लाकूड) असावा, वास्तू शास्त्रानुसार लाकूड आणि संगमवर नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करीत नाही.

नकारात्मक ऊर्जा अशी करा दूर

नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी प्रवेशद्वारावर काळ्या घोड्याची नाल देखील टांगता येते. ओम, स्वस्तिक, क्रॉस इत्यादी दिव्य चिन्हांनी मुख्य दरवाजा सजवावा. याशिवाय दारासमोर रांगोळी काढणे देखील शुभ मानले जाते. यामुळे घरात प्रवेश करण्याच्या आधी सकारात्मक भावना निर्माण होते.

हे सुद्धा वाचा

मुख्य दरवाजावर तांब्याचा सूर्य लावावा

घराच्या मुख्य दरवाजावर सूर्यदेवाची प्रतिमा लावणे शुभ मानले जाते. तांब्याची सूर्य प्रतिमा तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होईल याशिवाय तुम्ही ऑनलाईनही विकत घेऊ शकता.  सूर्य हा ग्रहांचा राजा आहे. सूर्यमूर्तीचे दर्शन घेताना सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करा. यामुळे सर्व ग्रहांचे दोष दूर होतील आणि घरामध्ये सकारात्मकताही राहील. हा उपाय तुमच्या सर्व समस्या दूर करू शकतो. यामुळे घरात बरकत राहते. कमाविलेला पैसा टिकून राहतो. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....