Vastu Tips : हातात टिकत नसेल पैसा तर मोरपंखाचा हा उपाय अवश्य करा, वास्तूशास्त्रात दिली आहे माहिती
असे मानले जाते की मोराच्या पिसांमध्ये सर्व देवी-देवता आणि नऊ ग्रह वास करतात. त्यामुळे ते घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. वास्तूशास्त्रानुसार घरात मोराची पिसे ठेवल्याने सर्व संकटे दूर होतात.
मुंबई : मोराचे पिसे हे देवतांचे आवडते अलंकार मानले जातात. हे विशेषतः भगवान श्रीकृष्णाला अर्पण केले जाते. वास्तूशास्त्रातही (Vastu tips) मोराच्या पिसांचं विशेष महत्त्व आहे. याला घरात ठेवल्याने अनेक प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. त्यामुळे आर्थिक स्थितीही मजबूत होते. घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी मोराची पिसे देखील खूप प्रभावी मानली जातात. चला जाणून घेऊया घरात सुख-समृद्धीसाठी मोरपंख कोणत्या दिशेला ठेवावे.
या दिशेला मोर पंख ठेवणे असते शुभ
असे मानले जाते की मोराच्या पिसांमध्ये सर्व देवी-देवता आणि नऊ ग्रह वास करतात. त्यामुळे ते घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. वास्तूशास्त्रानुसार घरात मोराची पिसे ठेवल्याने सर्व संकटे दूर होतात आणि घरात सुख-शांती येते. वास्तुशास्त्रानुसार मोराची पिसे नेहमी घराच्या आग्नेय दिशेला ठेवावीत. यामुळे घरात सुख-समृद्धी येते आणि घरातील वातावरणही चांगले राहते.
मोराचे पंख उधळपट्टीपासून करतात संरक्षण
जर तुमच्याकडे पैसा नसेल किंवा तुम्हाला उधळपट्टीची सवय असेल तर मोराच्या पिसाचे काही उपाय तुम्हाला लाभदायक ठरू शकतात. पूजेच्या ठिकाणी मोराची पिसे ठेवल्याने तुम्हाला विशेष फायदा होईल. पूजेत किंवा देवघरात ठेवलेले मोराचे पंख घरामध्ये सकासात्मक उर्जा कायम ठेवतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे नातेही गोड होते.
कालसर्प दोषापासून मिळते मुक्ती
जर कुंडलीत कालसर्प दोष असेल तर त्यासाठीही मोरपंखाचे उपाय फार प्रभावी मानले जातात. व्यक्तीने उशीखाली 7 मोराची पिसे ठेवावीत. मोराच्या पिसांचा हा उपाय केल्याने काल सर्प दोषापासून मुक्ती मिळते असे मानले जाते.
ग्रहांचा अशुभ प्रभाव असल्यास पोरपंखवर 21 वेळा ग्रहाच्या मंत्राचा उच्चार करून जल शिंपडावे आणि ज्या ठिकाणी ते दिसत असेल अशा ठिकाणी स्थापित करावे. आर्थिक फायद्यासाठी, मंदिरात जा आणि राधाकृष्णाच्या मुकुटावर मोराचे पंख लावा आणि 40 दिवसांनी ते आणा आणि तिजोरीत ठेवा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)