Vastu Tips: तुम्ही देखील पैशाशी संबंधित करत असाल ‘या’ चुका तर लगेच व्हा सावध!
अनेक जण रोजच्या जीवनात काही चुका करतात. या चुका एकंदरीतच माणसाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करतात.
मुंबई, प्रत्येकाला आपली जीवनशैली सुधारण्यासाठी आणि विलासी पद्धतीने जगण्यासाठी भरपूर पैसा (Money) हवा असतो. याशिवाय कुटुंबाच्या गरजा देखील असतातच यासाठी आपण रात्रंदिवस मेहनतही करतो, पण ज्योतिषशास्त्रानुसार कधी कधी फक्त मेहनत करून काहीच होत नाही. अनेकवेळा एखादी व्यक्ती कठोर परिश्रम करते पण दैनंदिन जीवनात अशा काही चुकाही करते, ज्यामुळे धनाची देवी लक्ष्मी (Goddess Lakshmi) त्याच्यावर नाराज होते. हेच कारण आहे की, लोकं कितीही मेहनत करत असले तरी पैशाशी संबंधित (Tips For wealth) समस्या त्यांना कधीच सोडत नाहीत. चला तर मग आज जाणून घेऊया की पैशाच्या बाबतीत कोणत्या छोट्या चुका आहेत ज्या आपण टाळायला हव्या.
- पैसे स्वच्छ ठिकाणी ठेवा: पैशाला लक्ष्मीचे रूप मानले जाते, त्यामुळे तुमचा मेहनतीचा पैसा नेहमी स्वच्छ ठिकाणी ठेवा. कारण माता लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे.
- लबाडीने कमाविलेले पैसे: अनेक जण लबाडीने आणि चुकीच्या मार्गाने पैसे कमवतात. अशा लोकांवर माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही आणि असा पैसा नेहमी तुमच्याकडे येतो पण तो जास्त काळ टिकत नाही.
- नोटा मोजताना थुंकी लावणे: पैसे मोजताना नोटांना थुंकी लावल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो. शास्त्रात हे अत्यंत अशुभ मानले गेले आहे. थुंकीने पैसे मोजल्याने धनाची देवी लक्ष्मीचा अनादर होतो आणि त्यामुळे माणूस गरीब होतो.
- पैसे फेकणे: जर तुम्ही एखाद्याला पैसे देत असाल तर कधीही पैसे फेकून देऊ नका, असे केल्याने माता लक्षमीचा अनादर होतो आणि घरात गरीब वाढू लागते. पैशांचा आदर केल्यास लक्ष्मी टिकून राहते.
हे सुद्धा वाचा
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)