Vastu Tips: आर्थिक संकटातून पाहिजे असेल सुटका तर ‘या’ दिशेला ठेवा तुळशीचे रोप, मिळेल लक्ष्मीचा आशीर्वाद
आर्थिक चणचण दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत. यापैकीच एक उपाय म्हणजे तुळशीचा उपाय आहे.
मुंबई, हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला (Tulsi Upay) अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशीला आयुर्वेदात औषधी वनस्पती मानले जाते. याशिवाय धार्मिक मान्यतेनुसार जिथे तुळशीचे रोप असते, तिथे देवी लक्ष्मीचा वास नेहमीच असतो आणि भगवान विष्णूची कृपा त्या कुटुंबावर राहते. तुळशीच्या रोपाबद्दल वास्तूशास्त्रात (Vastu Tips) काही नियम सांगितले आहे, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. ते नियम काय आहेत ते जाणून घेऊया.
चुकूनही ठेवू नका ‘या’ दिशेला तुळशीचे रोप
- घराच्या छतावर तुळशीचे रोप कधीही ठेवू नये, वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरातील सदस्यांना अशुभ परिणामांना सामोरे जावे लागते.
- ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह पैशाशी संबंधित असेल त्यांनी छतावर तुळशी ठेवल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढते.
- असे मानले जाते की तुळशीचा रोप छतावर ठेवल्याने घराच्या उत्तर दिशेला मुंग्या बाहेर पडू लागतात.
- तुळशीचे रोप पूर्व दिशेलाही ठेवू नये. यामुळे व्यवसायात नुकसान होते आणि कुटुंबावर विपरीत परिणाम होतो.
- तुळशीचे रोप कधीही दक्षिण किंवा दक्षिण पश्चिम दिशेला ठेवू नये.
अशा प्रकारे तुळशीचे रोप लावल्यास होईल फायदा
- तुळशीच्या रोपासाठी उत्तर दिशा ही सर्वोत्तम दिशा मानली जाते आणि जर ती उत्तर दिशेला लावायची नसेल तर तुम्ही ती ईशान्य दिशेलाही लावू शकता. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते.
- गुरुवारी तुळशीला जल अर्पण केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो, कारण गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे. तुळशीचे नवीन रोप वृंदावनात लावायचे झाल्यास शनिवारी शनिवारी लावावे, यामुळे आर्थिक संकटे दूर होतात.
- तुळशी वृंदवान नेहमी दारासमोर असावे. घराच्या मागच्या बाजूला तुळशी वृंदावन ठेऊ नये.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)