Vastu Tips : घरावर पिंपळाचे झाड उगवणे शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रानुसार अवश्य करा हे उपाय

घराच्या छतावर किंवा भिंतीच्या साहाय्याने पिंपळाचे झाड अनेकदा उगवल्याचे आपण सर्वांनीच पाहिले असेल. मग अशा परिस्थितीत काय करावे हे लोकांना समजत नाही.

Vastu Tips : घरावर पिंपळाचे झाड उगवणे शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रानुसार अवश्य करा हे उपाय
पिंपळाचे झाडImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 03, 2023 | 12:01 PM

मुंबई : हिंदू धर्मात पिंपळाचे झाड अतिशय पवित्र मानले जाते. पिंपळाच्या झाडात (Pimpal Tree) ब्रह्मा, विष्णू आणि भगवान शिव राहतात असे म्हणतात. या झाडाबाबत शास्त्रात अनेक नियम सांगण्यात आले आहेत. तसे, पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते, कारण सर्व देवी-देवता पिंपळाच्या झाडावर वास करतात. पण घरात पिंपळाचे झाड असणे वास्तुशास्त्रानुसार योग्य मानले जात नाही. पिंपळाचे झाड घरात वाढणे फारच अशुभ आहे. म्हणूनच पिंपळाचे झाड घरात वाढू देऊ नये आणि जर ते वाढले तर ते उपटून टाकावे. घराच्या छतावर किंवा भिंतीच्या साहाय्याने पिंपळाचे झाड अनेकदा उगवल्याचे आपण सर्वांनीच पाहिले असेल. मग अशा परिस्थितीत काय करावे हे लोकांना समजत नाही. जर तुमच्या घरातही पिंपळाचे झाड पुन्हा पुन्हा उगवत असेल तर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही. चला सविस्तर जाणून घेऊया की जर घरात पिंपळाचे झाड उगवले असेल तर ते कसे दूर करावे जेणेकरून वास्तुदोष होणार नाही.

जर तुमच्या घरावर पिंपळाचे झाड उगवले असेल तर या गोष्टी करा

  • जर तुमच्या घरावर पिंपळाचे झाड वाढले असेल तर ते थोडे वाढू द्या. त्यानंतर ते मातीसह खणून दुसऱ्या ठिकाणी लावावे.
  • घरात पिंपळाच्या झाडामुळे कुटुंबातील सदस्यांची प्रगती होत नाही आणि त्यामुळे रोज नवनवीन समस्या निर्माण होतात. पिंपळाचे झाड कापू नये, असे करणे अशुभ मानले जाते. विशेष स्थितीत ते कापायचा असेल तर पूजा केल्यानंतर फक्त रविवारीच कापावे. इतर कोणत्याही दिवशी ते कापू नये.
  • जर तुमच्या घरात पिंपळाचे झाड वारंवार उगवत असेल तर त्या पिंपळाच्या झाडाची 45 दिवस पूजा करावी आणि त्याला कच्चे दूध अर्पण करत राहावे. त्यानंतर 45 दिवसांनी पीपळाचे रोप मुळासह इतर ठिकाणी लावावे. असे केल्याने वास्तुदोष होणार नाहीत.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.