ही एक चमत्कारी मूर्ती घरात किंवा ऑफीसमध्ये ठेवा; गरीबालाही मिळते कुबेराची श्रीमंती

हिंदू धर्मात वास्तू शास्त्राला मोठं महत्त्व आहे. वास्तू शास्त्रामध्ये तुमचं जीवन सुखी करण्यासाठी, घरात समृद्धी येण्यासाठी अनेक उपाय सांगितलेले आहेत. यातील एका उपयाबाबत आज आपण माहिती घेणार आहेत.

ही एक चमत्कारी मूर्ती घरात किंवा ऑफीसमध्ये ठेवा; गरीबालाही मिळते कुबेराची श्रीमंती
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 4:24 PM

Vaastu Tips हिंदू धर्मात वास्तू शास्त्राला मोठं महत्त्व आहे. वास्तू शास्त्रामध्ये तुमचं जीवन सुखी करण्यासाठी, घरात समृद्धी येण्यासाठी अनेक उपाय सांगितलेले आहेत. घर बनवण्यापासून ते घरात कुठीली वस्तू कुठे ठेवावी इथपर्यंतच मार्गदर्शन वास्तू शास्त्रामध्ये केलं आहे. वास्तू शास्त्रानुसार अशा काही मूर्ती आहेत, ज्या घरात ठेवलं अत्यंत शुभ मानलं जातं. या मूर्ती जर तुमच्या घरात असतील तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही. आज आपण चांदीपासून बनवलेल्या मोराच्या मूर्तीबाबत माहिती घेणार आहोत.चांदीचा मोर घरात किंवा ऑफिसमध्ये असणं अत्यंत शुभ मानलं जातंय.

जर तुम्ही चांदीचा मोर तुमच्या घरात किंवा ऑफीसमध्ये ठेवला तर तुम्हाला त्याचे चमत्कारीक फायदे बघायला मिळू शकतात. या मूर्तीमुळे सकारात्मक वातावरण निर्मितीला मदत मिळते. घरात सुख शांती, समृद्धी राहाते. पैशांची कमतरता जाणवत नाही. याशिवाय तुमच्या वैवाहिक जीवनात जर कलह सुरू असेल तर तो दोष देखील दूर होण्यास मदत होते. त्यामुळे घरात चांदीचा मोर ठेवणं हे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे.

घरात चांदीचा मोर कुठे ठेवावा?

वास्तू शास्त्रानुसार तुम्ही घरात किंवा ऑफीसमध्ये चांदीचा मोर ठेवू शकता.जर तुम्हाला व्यवसायात तोटा सहन करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या दुकान किंवा ऑफीसमध्ये चांदीचा मोर ठेवू शकता. तुम्हाला हा मोर दक्षिण -पूर्व दिशेला ठेवायचा आहे. किंवा तुम्ही ही मोराची मूर्ती तुमच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता. घरात ठेवायचा असेल तर तुम्ही ही मोराची मूर्ती तुमच्या घराच्या हॉलमध्ये ठेवू शकता.

कौटुंबीक कलह दूर होतात

वास्तू शास्त्रानुसार जर तुमच्या घरात सतत छोट्या-छोट्या कारणांवरून भांडंण होत असतील, वैवाहिक जीवन सुखी नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये चांदीच्या मोराची मूर्ती ठेवू शकता.यामुळे तुमच्या कुंटुबातील कलह दूर होतील. तसेच सुखी वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी देखील दूर होतील. घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.