Vastu Tips : घरात ठेवा या चार वस्तू, आर्थिक समस्या राहतील कोसो दूर

हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले जाते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी लोक विविध उपाय करतात. पौराणिक मान्यता आहे की या वस्तू घरात ठेवल्यास देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते.

Vastu Tips : घरात ठेवा या चार वस्तू, आर्थिक समस्या राहतील कोसो दूर
माता लक्ष्मीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 26, 2023 | 11:09 AM

मुंबई : प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याला आयुष्यात सुख, समृद्धी आणि संपत्ती मिळावी, जेणेकरून तो आपल्या कुटुंबासोबत आनंदी जीवन जगू शकेल. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले जाते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी लोक विविध उपाय करतात. पौराणिक मान्यता आहे की या वस्तू घरात ठेवल्यास देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते. तसेच घरातील नकारात्मक उर्जा यामुळे दुर राहते. सकारात्मक उर्जेचा संचार झाल्याने घरात सुख संमृद्धी नांदू लागते. जाणून घेऊया काही प्रभावी वास्तू (Vastu Tips) उपाय.

देवघरात ठेवा नारळ

नारळाचा वापर विशेषतः कोणत्याही शुभ कार्यात केला जातो. हिंदू धर्मात नारळ शुभ मानले जाते. असे मानले जाते की देवी लक्ष्मीचा वास त्या फळामध्ये असतो. ते घरात ठेवल्याने शुभ परिणाम मिळतात आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. पुजेच्या ठिकाणी नारळ ठेवताना त्याच्या खाली लाल कापड ठेवावे. त्या नारळाला रोज लाल फुल वाहावे.

शंख

हिंदू धर्मात प्राचीन काळापासून पूजेमध्ये शंख वाजवण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की शंखनाद केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरामध्ये शंख ठेवणे खूप शुभ मानले जाते, कारण ते भगवान विष्णूने धारण केले आहे आणि या कारणास्तव ते देवी लक्ष्मीला देखील खूप प्रिय आहे. घरात शंख ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशिर्वाद राहतो.

हे सुद्धा वाचा

तुळस

तुळशीला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. त्यामध्ये तुळशी मातेचा वास असल्याचे मानले जाते. दररोज तुळशीला जल अर्पण केल्याने आणि लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी राहते. रविवारी आणि एकादशीला तुळशीमातेला जल अर्पण करू नका.

कमळाचे फूल

कमळाच्या फुलावर माता लक्ष्मी विराजमान आहे. हे फूल देवी लक्ष्मीचेही आवडते फूल मानले जाते. घराच्या मुख्य दारावर कमळाचे फूल ठेवणे शुभ मानले जाते. माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये कमळाचे फुल अवश्य वापरावे. यामुळे विशेष फायदा होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.