Vastu Tips :  कधीच करू नये या सात वस्तूंचे दान, करावा लागू शकतो मोठ्या समस्यांचा सामना

| Updated on: Aug 31, 2023 | 4:09 PM

Vastu Tips असे मानले जाते की दान केल्याने केवळ मन शांत राहत नाही तर आपल्यातील अनेक दुर्गुणही दूर होतात, परंतु तुम्हाला माहित आहे का की काही गोष्टी अशा आहेत ज्यांचे दान तुमच्यासाठी अशुभ ठरू शकते.

Vastu Tips :  कधीच करू नये या सात वस्तूंचे दान, करावा लागू शकतो मोठ्या समस्यांचा सामना
दान धर्म
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : कोणत्याही धर्मात दानाला खूप महत्त्व आहे. दानापेक्षा कोणतेही पुण्य मोठे मानले जात नाही. दान करण्याची परंपरा आत्तापासूनच नाही तर प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. असे मानले जाते की दान केल्याने केवळ मन शांत राहत नाही तर आपल्यातील अनेक दुर्गुणही दूर होतात, परंतु तुम्हाला माहित आहे का की काही गोष्टी अशा आहेत ज्यांचे दान तुमच्यासाठी अशुभ ठरू शकते. पुण्याच्या ऐवजी संकटे पदरी पडू शकतात. स्वतःचे नुकसान करतात. चला तर मग जाणून घेऊया वास्तूशास्त्रातील (Vastu Tips) अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे दान केल्याने नुकसान होऊ शकते जेणेकरुन तुम्ही पुढच्या वेळी दान करताना त्या लक्षात ठेवू शकाल.

या वस्तूचे दान केल्याने व्यवसायात नुकसान होईल

ज्योतिषशास्त्रानुसार प्लास्टिकच्या वस्तू दान करणे शुभ नाही. असे मानले जाते की प्लॅस्टिकपासून बनवलेल्या वस्तू दान केल्याने घराच्या प्रगतीमध्ये अडथळा येऊ शकतो आणि प्लास्टिक दान केल्यास व्यवसायात गंभीर नुकसान होऊ शकते.

या वस्तूचे दान केल्याने लक्ष्मी माता होते नाराज

झाडू ही रोजची उपयोगी वस्तू आहे पण त्याचे दान करणे ज्योतिषशास्त्रात हानिकारक मानले गेले आहे. असे मानले जाते की झाडू दान केल्याने धनाची देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि यामुळे व्यवसायातही नुकसान होते आणि बचत कमी होऊ लागते, त्यामुळे झाडू दान करू नये.

हे सुद्धा वाचा

या वस्तूचे दान केल्याने सुख-शांती कमी होते

कधी कधी आपण दान म्हणून स्टीलची भांडीही देतो. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार स्टीलची भांडी दान करणे आपल्या घरासाठी अशुभ ठरू शकते. असे मानले जाते की स्टीलची भांडी दान केल्याने कुटुंबातील शांती आणि आनंद बिघडतो आणि भांडणे वाढते, म्हणून स्टीलची भांडी दान करणे टाळावे.

या वस्तूचे दान केल्याने शनिदेव होतात क्रोधित होतात

तेल दान करणे शुभ मानले जात असले तरी काही लोकं खराब झालेले किंवा वापरलेले तेल दान करतात. तुम्हीही असे करत असाल तर तुम्हाला अशुभ परिणाम मिळू शकतात. ज्योतिष शास्त्रानुसार शनि ग्रहाच्या शांतीसाठी तेलाचे दान केले पाहिजे, परंतु जर तुम्ही पूर्वी वापरलेले तेल किंवा खराब तेल दान केले तर शनिदेव प्रसन्न होण्याऐवजी क्रोधित होतील आणि तुम्हाला विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात. यासोबतच घरातील संकटे वाढतात आणि काही संकटे येण्याची शक्यता असते.

या वस्तूचे दान केल्याने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू शकतो

अनेकदा आपण आपले जुने कपडे गरजूंना देतो पण ज्योतिष शास्त्रानुसार आपण आपले जुने कपडे कोणत्याही गरजूला देऊ शकतो पण ते कपडे दान म्हणून देऊ नयेत. तसेच जुने कपडे कोणत्याही पुजार्‍याला दान करू नयेत. परिधान केलेले कपडे दान करणे अशुभ आहे. यामुळे लक्ष्मीजी तुमच्यावर नाराज होऊ शकतात आणि तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

या वस्तूचे दान केल्याने नात्यात दुरावा येऊ शकतो

चाकू, कात्री, तलवार इत्यादी धारदार वस्तूंचे कधीही दान करू नये, कारण असे करणे ज्योतिषशास्त्रात हानिकारक असल्याचे सांगितले आहे. असे मानले जाते की तीक्ष्ण वस्तूंचे दान केल्याने कुटुंबातील सुख-शांती बिघडते, याशिवाय कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव वाढून नातेसंबंध बिघडण्याची शक्यता असते.

या वस्तूचे दान केल्याने कुटुंबातील सदस्य आजारी असतील

भुकेल्यांना अन्नदान करण्यासारखा मोठा दानधर्म नाही असे म्हणतात. अन्नदान केल्याने पुण्य मिळते पण हे लक्षात ठेवा की शिळे अन्न कोणाला दान करू नका. ज्योतिषशास्त्रानुसार असे केल्याने आपल्या कुटुंबासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. शिळे अन्न खाल्ल्याने कुटुंबातील सदस्यांना आजार होऊ शकतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)