Vastu Tips: झोपेतून उठल्याबरोबर कधीच पाहू नये ‘या’ गोष्टी; वास्तुशास्त्रात सांगितले आहे कारण
एखाद्याचा दिवस वाईट गेला असेल किंवा एका मागोमाग एक वाईट घटना घडत असतील तर त्यांना एक प्रश्न नक्की विचारला जातो सकाळी उठल्यावर कोणाचा चेहरा पाहिला किंवा काय पाहिलं म्हणून आजचा दिवस इतका वाईट गेला. म्हणूनच हिंदू धर्मात असे म्हटले जाते की, सकाळी उठल्याबरोबर देवाचं दर्शन घ्यावं. ज्यामुळे तुमचा दिवस चांगला जाईल. परंतु अनेक वेळा माणूस […]
एखाद्याचा दिवस वाईट गेला असेल किंवा एका मागोमाग एक वाईट घटना घडत असतील तर त्यांना एक प्रश्न नक्की विचारला जातो सकाळी उठल्यावर कोणाचा चेहरा पाहिला किंवा काय पाहिलं म्हणून आजचा दिवस इतका वाईट गेला. म्हणूनच हिंदू धर्मात असे म्हटले जाते की, सकाळी उठल्याबरोबर देवाचं दर्शन घ्यावं. ज्यामुळे तुमचा दिवस चांगला जाईल. परंतु अनेक वेळा माणूस सकाळी उठल्याबरोबर आपल्या कामात व्यस्त होतो आणि देवाला नमस्कार करायला विसरतो. प्रत्येक कामात अपयश येणे, कष्ट करूनही फळ मिळत नाही आणि केले जाणारे कामही बिघडू लागणे, असं सर्व तुमच्यासोबत देखील घडत असेल, तर तुम्ही सकाळी उठल्यावर काही गोष्टी पाहणे टाळा (Never see these things). खरंतर वास्तुशास्त्रात (Vastu Tips) अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या आपण सकाळी झोपेतून उठून पहिल्या तर आपला संपूर्ण दिवस खराब जातो. चला तर मग जाणून घेऊयात की, अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या सकाळी उठल्यावर आपण पाहू नये.
आरसा
सकाळी डोळे उघडताच आरशात पाहणे टाळावे, असे वास्तुतज्ज्ञांचे मत आहे. असे मानले जाते की, सकाळी व्यक्तीच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा असते आणि अशा वेळी जर एखाद्या व्यक्तीने आरशात पाहिले, तर ती ऊर्जा द्विगुणित होते. त्यामुळे नकारात्मक गोष्टी घडण्याची शक्यता असते. म्हणून, सकाळी उठून सर्वप्रथम चेहरा धुवा, मगच आरशात पहावे.
बंद घड्याळ
घरात बंद घड्याळ ठेवणे अशुभ मानले जाते. त्यामुळे घराच्या भिंतींवर बंद घड्याळ लावू नका. जर तुम्ही सकाळी उठल्यावर हे बंद घड्याळ पाहिले तर डोक्यात नकारात्मक विचारांची शृंखला तयार होते. त्यामुळे सकाळी बंद घड्याळाकडे पाहणे टाळावे.
आक्रमक प्राणी किंवा पक्षी
वास्तूनुसार घरामध्ये आक्रमक प्राणी आणि पक्ष्यांचे फोटो लावणे वर्ज्य आहे. पण तरीही, जर कोणी ते लावले, तर त्याने सकाळी ही फोटो पाहणे टाळावे. सकाळची अशी चित्रे पाहून दिवस कोणत्या ना कोणत्या वादातच जातो.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)