Vastu Tips: घरातल्या ईशान्य दिशेला वास्तुशास्त्रात आहे विशेष महत्त्व, या नियमाचे पालन केल्यास होईल भरभराट

घराचा ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवावा जेणेकरून घरात सुख, शांती, आरोग्य आणि लक्ष्मी वास करेल. ईशान हे भगवान शिवाचे नाव देखील आहे आणि त्याचे स्थान उत्तर-पूर्व दिशेला आहे. त्यामुळे घरातही या दिशेचा उपयोग केवळ मंदिर किंवा पूजेसाठी केला जातो.

Vastu Tips: घरातल्या ईशान्य दिशेला वास्तुशास्त्रात आहे विशेष महत्त्व, या नियमाचे पालन केल्यास होईल भरभराट
वास्तुशास्त्र Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 10:51 AM

वास्तुशास्त्रात, (Vastu Tips) निर्देशानुसार पालन केल्याने नेहमी इच्छित परिणाम मिळतात. आज उत्तर-पूर्व दिशेबद्दल जाणून घेऊया. उत्तर आणि पूर्व यांमधील दिशेला वास्तूमध्ये ईशान्य कोन म्हणतात. ही दिशा-क्षेत्र कोणत्याही वास्तूचे सर्वात पवित्र स्थान आहे. ज्यामध्ये देवाचा निवास असतो. वास्तूशास्त्राच्या (Vastushastra) नियमानुसार, घराचा ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवावा जेणेकरून घरात सुख, शांती, आरोग्य आणि लक्ष्मी वास करेल. ईशान हे भगवान शिवाचे नाव देखील आहे आणि त्याचे स्थान उत्तर-पूर्व दिशेला आहे. त्यामुळे घरातही या दिशेचा उपयोग केवळ मंदिर किंवा पूजेसाठी केला जातो. वास्तूनुसार या स्थानासाठी काही खास गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

या गोष्टींची घ्या काळजी

वास्तूनुसार,  घराच्या ईशान्य कोपर्‍यात कोणतीही जड वस्तू ठेवू नये. असे मानले जाते की जर तुम्ही या ठिकाणी एखादी जड वस्तू ठेवली तर सकारात्मक ऊर्जेचा संचार थांबतो, ज्यामुळे आर्थिक उत्पन्न कमी होऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी जड कपाट, स्टोअर रूम इत्यादी करणे टाळा.

घराची ही दिशा सर्वात पवित्र मानली जाते आणि येथे देवाचा वास असल्याचे मानले जाते. त्यामुळे या ठिकाणी कधीही चपला जोडे  किंवा कचरा पेटी ठेऊ नका. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा संचारते आणि समस्या निर्माण होऊ लागतात.

हे सुद्धा वाचा

घराच्या ईशान्य कोपऱ्यात शौचालय नसावे. असे केल्याने शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात. पॆशांची बचत होत नाही. नवविवाहित जोडप्याची बेडरूम घराच्या ईशान्य कोपऱ्यात बनवू नये. असे केल्याने परस्पर संबंधात दुरावा येतो आणि अनावश्यक समस्या वाढू लागतात.

या गोष्टी अवश्य करा

जर तुम्हाला घराचे सुख हवे असेल तर घराच्या ईशान्य कोपर्‍यात देवघर बनवावे. या ठिकाणी केलेली पूजा नेहमी देवाला मान्य असते आणि यामुळे घरातील सुख-समृद्धीही कायम राहते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी या दिशेचा परिसर स्वच्छ ठेवावा जेणेकरून घरात नकारात्मक ऊर्जा राहणार नाही. विहीर, बोअरिंग, मटका किंवा पिण्याचे पाणी यासारख्या कोणत्याही जलस्रोतासाठी हे ठिकाण नेहमीच उत्तम असते. जर तुम्ही नवीन घर बांधत असाल तर घराच्या या कोपऱ्यात बोरिंग खोदा किंवा जमिनीखाली पाण्याची टाकी बनवा.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.