मुंबई : माता लक्ष्मीला धनाची देवता म्हणून ओळखले जाते. ज्या व्यक्तीवर लक्ष्मी प्रसन्न असते तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही. धनाची देवी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे उपाय करतात. शास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्यात देवी लक्ष्मी वास करते असे मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीने या वस्तू (Vastu Tips) घरात ठेवल्या तर त्याच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होते. तसेच व्यक्तीची आर्थिक संकटातून सुटका होते. अनेक श्रीमंत लोकं या गोष्टी पाळतात. त्यांच्या घरी या गोष्टी अवश्य पाहायला मिळतात. या गोष्टींबद्दल जाणून घ्या.
नारळ हे लक्ष्मीला सर्वात जास्त प्रिय असते आणि त्यामुळेच नारळाला श्रीफळ म्हणतात. श्री हे लक्ष्मीचे दुसरे नाव आहे. हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी नारळ फोडण्याची परंपरा आहे. म्हणूनच ते खूप शुभ मानले जाते. घरात ठेवल्याने लक्ष्मीची कृपा सदैव राहते. यासोबतच घरात आर्थिक संकट येत नाही.
शास्त्रानुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना शंख अत्यंत प्रिय आहे. समुद्रमंथनातून शंख मिळाल्याचे सांगितले जाते. देवता आणि असुर यांच्यातील समुद्रमंथनादरम्यान 14 रत्ने सापडली, त्यापैकी एक शंख होता. घरात ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये देवी लक्ष्मीसोबत कुबेर यांचे चित्र लावणे शुभ असते. लक्ष्मी, भगवान कुबेर यांच्या चित्रासोबत स्वस्तिक चिन्ह लावल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
शस्त्रांनुसार देवी लक्ष्मी कमळाच्या फुलावर विराजमान आहे. कलमाचे फूल लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. असे म्हणतात की ज्या घरात कमळाची फुले लावली जातात, तिथे लक्ष्मीचा वास असतो. दुसरीकडे, जेव्हा तुम्ही देवी लक्ष्मीची पूजा कराल तेव्हा तुम्ही तिला कमळाचे फूल अर्पण केले पाहिजे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)