Vastu Tips | चुकूनही ‘या’ दिशेला डोके करून झोपू नका, जाणून घ्या झोपण्याच्या योग्य पद्धती…
चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे. दिवसभर दमून गेल्यानंतर रात्री झोपताना, आपण नेमक्या कोणत्या बाजूला डोके करून झोपतो, याचा विचार करत नाही.
मुंबई : चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे. दिवसभर दमून गेल्यानंतर रात्री झोपताना, आपण नेमक्या कोणत्या बाजूला डोके करून झोपतो, याचा विचार करत नाही. झोपेत असताना बर्याच वेळा आपण अशी चूक करतो, ज्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो. पुरेशी झोप मिळण्याचे महत्त्व, विज्ञान आणि धर्म या दोहोंमध्ये नमूद केले आहे (Vastu tips sleeping position as per vastu shashtra).
झोपण्याची योग्य पद्धत कोणती असावी, याविषयी वास्तुशास्त्रात काही गोष्टी सांगितल्या आहेत. धार्मिक ग्रंथानुसार, झोपताना आपले डोके दक्षिण किंवा उत्तर दिशेने असले पाहिजे. म्हणजेच आपले पाय उत्तर व पश्चिम दिशेने असले पाहिजेत, ही झोपण्याची नैसर्गिक पद्धत आहे. चला तर, कोणत्या दिशेने झोपणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते, हे जाणून घेऊया…
दक्षिणेकडे डोके करून झोपण्याचा फायदा
वास्तुशास्त्राच्या मते दक्षिण दिशेने डोके करून झोपल्याने आपले आरोग्य निरोगी राहते आणि यामुळे आपण सर्व प्रकारच्या आजारांपासून दूर राहु शकता. हा विश्वास वैज्ञानिक तथ्यांवरही आधारित आहेत. असा विश्वास आहे की, दक्षिण दिशेकडे पाय करून झोपल्यानंतर डोक्यातून चुंबकीय प्रवाह येतो आणि पायात प्रवेश करतो. यामुळे, मानसिक ताण वाढतो आणि आपण सकाळी उठल्यावर आपले मन दुःखी वाटते (Vastu tips sleeping position as per vastu shashtra).
पूर्वेकडे डोके करून झोपणे
या व्यतिरिक्त, आपण इच्छित असल्यास, आपण आपले डोके पूर्वेकडे आणि पाय पश्चिम दिशेने ठेवू शकता. कारण, सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि हिंदू धर्मात, सूर्याला जीवन प्रदाता मानले जाते. अशा स्थितीत पूर्व दिशेने पाय करून झोपणे शुभ मानले जात नाही. म्हणून, डोके पूर्वेकडील दिशेने ठेवणे चांगले. असे केल्याने आपण दीर्घायुषी देखील व्हाल.
झोपेशी संबंधित महत्वाच्या गोष्टी
– झोपेचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी जवळचा संबंध आहे. म्हणून ऋषी-मुनींनी झोपेसाठी काही नियम बनवले आहेत. शास्त्रानुसार संध्याकाळी झोपू नये.
– निरोगी आरोग्यासाठी, झोपेच्या दोन तास आधी अन्न खावे. जेणेकरून पोटाच्या समस्या दूर राहतात.
– तातडीची कामे नसल्यास रात्री उशीरापर्यंत जागू नये.
– झोपेच्या आधी मन शांत ठेवा आणि देवाचे ध्यान करा.
(विशेष टीप: ‘टीव्ही 9 मराठी’ कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचं समर्थन करत नाही, प्रस्तुत लेखात ज्योतिषशास्त्राच्या उपायांचा उल्लेख करण्यात आला आहे.)
(Vastu tips sleeping position as per Vastu shastra)
हेही वाचा :
Pradosh Vrat | आनंद, सौभाग्य आणि समृद्धी देणारा बुध प्रदोष, जाणून घ्या ‘या’ व्रताची कथा…
Vastu Tips | वास्तु दोष आणि राहु-केतुचा अशुभ प्रभाव कमी करेल ‘मीठ’, वाचा काय कराल?
Chaitra Navratri 2021 | चैत्र नवरात्रीचा शुभारंभ कधी? कलश स्थापनेचा विधी काय?https://t.co/V3ZUWSDrce#ChaitraNavratri2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 22, 2021